Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि.२८: भारत सरकारच्या श्रम मंत्रालयांतर्गत दत्तोपंत ठेंगडी केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाच्या पुणे प्रादेशिक सल्लागार समितीच्या कामगार प्रतिनिधी सदस्यपदी जवाहर कामगार संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव अरविंद हळदकर यांची २०२६ ते २०२८ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी फेरनिवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे त्यांची या पदावर तिसऱ्यांदा नियुक्ती झाली आहे.
श्री. हळदकर हे कोल्हापूर जिल्हा साखर कामगार समन्वय समितीचे कार्याध्यक्ष असून, जवाहर साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत. कामगार क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांची ‘कामगार भूषण’ पुरस्कारासाठी निवड केली आहे.
सन १९९७ पासून त्यांनी केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाच्या माध्यमातून कामगार शिक्षक म्हणून काम केले आहे. जवाहर साखर कारखान्यात त्यांनी सुमारे २५ वर्षे कामगार प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करून कामगारांना मार्गदर्शन केले. तसेच ग्रामीण भागातील असंघटित कामगारांसाठी मंडळाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.या निवडीसाठी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे, जवाहर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक मनोहर जोशी, तसेच प्रादेशिक संचालिका अरुणा वाघ यांचे सहकार्य लाभले
Mahalaxmi times is weekly Marathi news paper.mainly working in three Dist.kolhapur,sangli n ratnagiri.along with print media we have face book pages, Instagram,youtube channel,web
news portal . namely news17 .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.