सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी महेंद्रआप्पा लाड; उपाध्यक्षपदी शिवसेनेचे तानाजीदादा पाटील यांची निवड!

कनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, आमदार सुहासभैया बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेला सहकार क्षेत्रात प्रतिनिधित्व

सांगली :मयुरी देशपांडे 

दि.१८ : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी श्री. महेंद्रआप्पा लाड, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे श्री. तानाजीदादा पाटील यांची निवड झाली आहे. या निवडीमुळे सांगली जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात शिवसेनेला महत्त्वाचे प्रतिनिधित्व मिळाले आहे.मा. उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार मा. सुहासभैया बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक वाटचाल सुरू आहे. तानाजीदादा पाटील यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी झालेली निवड ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब मानली जात आहे.

   सहकार क्षेत्र हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असून, जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी, सभासद आणि विविध सहकारी संस्थांशी संबंधित प्रश्न सोडविण्याची मोठी जबाबदारी असते. या पार्श्वभूमीवर महेंद्रआप्पा लाड आणि तानाजीदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सांगली जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी तसेच जनसामान्यांचे प्रश्न आणि विकासकामांना प्राधान्य देण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार सुहासभैया बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शिवसेनेची वाटचाल यापुढेही सुरू राहील, असा विश्वास शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.