बाळासाहेब ठाकरे यांच्या पोस्टरची विटंबना केल्याच्या निषेधार्थ सांगलीत ठाकरे गटाचे आंदोलन!

शायना एन. सी. यांच्या प्रतिमेला जोडे मारून शिवसैनिकांकडून निषेध; जिल्हाप्रमुख विशालसिंग राजपूत यांचा शिंदे गटाला इशारा

सांगली :मयुरी देशपांडे 

दि.२०: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पोस्टर शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एन. सी. यांनी फाडल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सांगलीत तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौक (जुना स्टेशन चौक) येथे झालेल्या या आंदोलनात शायना एन. सी. यांच्या प्रतिमेला जोडे मारून शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला.सांगली जिल्हा संपर्कप्रमुख स्वप्निलजी कुंजीर पाटील यांच्या आदेशाने आणि जिल्हाप्रमुख विशालसिंग राजपूत यांच्या प्रयत्नातून या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         आंदोलनावेळी बोलताना जिल्हाप्रमुख विशालसिंग राजपूत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे यांच्या मागे भाजपच्या नेतृत्वाचा हात असून, पडद्यामागून बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. याच रणनीतीचा भाग म्हणून शायना एन. सी. यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आल्याचा दावा करत, बाळासाहेब ठाकरे यांच्या पोस्टरची विटंबना केल्याची घटना निषेधार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान शिवसैनिक कदापि सहन करणार नाहीत. यापुढे अशा प्रकारच्या घटना घडल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही विशालसिंग राजपूत यांनी यावेळी दिला.

या आंदोलनात जिल्हाप्रमुख विशालसिंग राजपूत, जिल्हा महिला संघटिका सुजाता इंगळे, महादेव मगदूम, मयूर घोडके, जितेंद्र शहा, कुबेरसिंग राजपूत, भगवानदास केंगार, विनोद शेलार, राहुल यमगर, किरण कांबळे, सुनंदा पाटील, बाळासाहेब हत्तीकर, दीपा इंगळे, शितल पाटील, पांडू लोहार, संजय पाटील, प्रसाद रीसवडे, संतोष पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.