श्री विठ्ठल-बिरदेव भक्त परिवारावर दुःखाचा डोंगर; फरांडे महाराजांचे निधन
श्री विश्वनाथ नारायण वाघमोडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली; देश-विदेशात विठ्ठल-बिरदेव भक्तीचा प्रसार करणारे अध्यात्मिक व्यक्तिमत्त्व हरपले
पट्टणकोडोली : वैशाली भोसले
दि.२८: श्री विठ्ठल-बिरदेव यांच्या भक्तीचा आणि परंपरेचा झेंडा देश-विदेशात पोहोचविणारे, आपले संपूर्ण आयुष्य भगवंताच्या सेवेसाठी समर्पित करणारे परमपूज्य श्री विश्वनाथ नारायण वाघमोडे (फरांडे महाराज) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने श्री विठ्ठल-बिरदेव भक्त परिवारासह वारकरी संप्रदाय आणि लाखो भाविकांमध्ये शोककळा पसरली आहे.
फरांडे महाराज यांनी आयुष्यभर श्री विठ्ठल-बिरदेव यांच्या भक्तीचा, महात्म्याचा आणि परंपरेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अविरत कार्य केले. आपल्या भक्तिमय सेवेतून त्यांनी असंख्य भाविकांना अध्यात्म, श्रद्धा आणि भक्तीची प्रेरणा दिली. महाराष्ट्रासह देश-विदेशात विठ्ठल-बिरदेव यांच्या भक्तीचा प्रसार करण्यात त्यांचे योगदान मोलाचे ठरले.त्यांच्या निधनाने भक्त परिवाराने एक निष्ठावंत सेवक, मार्गदर्शक आणि अध्यात्मिक व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या कार्याची आणि भक्तिमय स्मृतींची आठवण भाविकांच्या मनात सदैव राहील.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.