अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेकासन यांची कोकण रेल्वे कार्यालयात सदिच्छा भेट

नवीन रुजू झालेल्या क्षेत्रीय प्रबंधक कांबळे ह्यांना दिल्या शुभेच्छा

रत्नागिरी: मुजीब खान 
दि 24 रत्नागिरी  येथील कोकण रेल्वे कार्यालयात नव्याने रूजू झालेले क्षेत्रिय प्रबंधक रविंद्र कांबळे यांची काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्हाध्यक्ष शेकासन यांनी रेल्वेच्या प्रवाशांच्या विविध प्रश्न, समस्यांबाबत कांबळे यांचेशी चर्चा केली. रत्नागिरी-कोल्हापूर मार्गापासून ते रेल्वस्थानका पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना तसेच वाहन चालवताना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्या बाबत अनेकदा दुरुस्तीची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे अशी ओरड प्रवाशांकडून होत असल्याचे शेकासन यांनी कांबळे यांच्या लक्षात आणून दिले. तसेच हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी केली.

रत्नागिरी रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी असलेला सरकता जिना अनेक दिवस बंद असल्याने प्रवाशांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे त्या मुळे तो लवकर दुरुस्त करावा. अशी मागणी शेकासन यांनी केली. त्यावेळी शेकासन यांनी काही सहकार्य हवे असल्यास ते आम्ही कधीही करण्यास तयार आहोत असे कांबळे यांना सांगितले. त्याबद्दल कांबळे यांनी समाधान व्यक्त केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.