*संगमेश्वर तालुका मुस्लिम ट्रस्टची नवीन कार्यकारिणी,अध्यक्षपदी मजीद नेवरेकर*
संगमेश्वर तालुका मुस्लिम ट्रस्ट मिटींग
संगमेश्वर: –ताऊ नेवरेकर
संगमेश्वर तालुका मुस्लिम ट्रस्टची मिटिंग आज कसबा दखनी मोहल्ला येथील तालाब मस्जिद अंगनात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
या सभेमध्ये नवीन अध्यक्ष्यांची निवड करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते व समाजासाठी सतत धडपडणारे व्यक्ती आदरणीय मजीद नेवरेकर (कळंबस्ते) यांची संगमेश्वर तालुका मुस्लिम ट्रस्टच्या अध्यक्षपदी सर्वासर्वानुमते निवड करण्यात आली.उपाध्यक्षपदी ईलियास मापारी (कसबा)तर सचिव व खजिनदार अकबर काका दसुरकर (कळंबस्ते)यांची निवड करण्यात आली. संगमेश्वर तालुका मुस्लिम ट्रस्ट मध्ये सलाऊद्दीन शिरगावकर (आंबवली),इंतिखाब अलजी(कुरधुंडा),सुलतान अफसानी(सोनगिरी),गणी मापारी (मुचरी),मुजीब खान (कडवई) ह्या नवीन कार्यकारी सदस्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
संगमेश्वर तालुका मुस्लिम ट्रस्टची पुढील सभा कसबा दखनी मोहल्ला मशीदीच्या अंगनात दिनांक 02/02/2022 बुधवार रोजी घेण्यात येणार आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.