त्या 42 कर्मचार्यांच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांचा सत्कार
इचलकरंजी : विजय मकाटे
दि २ जानेवारी :शासन सेवेत 42 कर्मचार्यांना सामावून घेण्यासंदर्भात पाच वर्षापासून सुरु असलेल्या संघर्षात पाठबळ देत शासनस्तरावर पाठपुराव करुन न्याय मिळवून दिल्याबद्दल 42 कर्मचार्यांच्यावतीने आमदार प्रकाश आवाडे यांचा सत्कार करण्यात आला.
इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल (आयजीएम) चे राज्य शासनाकडे हस्तांतरण केल्यानंतर इचलकरंजी नगरपरिषदेकडील 42 कर्मचार्यांना शासनाच्या आरोग्य विभागाने समावेशन करुन घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे मागील पाच वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित राहिला होता. आपल्याला शासनाच्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सामावून घ्यावे यासाठी त्या 42 कर्मचार्यांनी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करण्यासह शासन दरबारी प्रयत्न सुरु केले होते. या प्रश्नी आमदार प्रकाश आवाडे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुन त्या कर्मचार्यांना न्याय देण्याची मागणी केली होती. त्याला यश येऊन काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने त्या 42 कर्मचार्यांना सामावून घेण्याचा निर्णय घेत जीआर काढला आहे.
कर्मचार्यांच्या न्यायासाठी सातत्याने वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याबद्दल त्या कर्मचार्यांनी आमदार प्रकाश आवाडे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. विविध पातळीवर संघर्ष करणार्या त्या 42 कर्मचार्यांचा शासकीय सेवेमध्ये सामावून घेऊन शासनाने त्यांना न्याय दिला आहे. या निर्णयामुळे कर्मचार्यांच्या भवितव्याचा प्रश्न सुटला असल्याचे सांगत आमदार आवाडे यांनी सर्व कर्मचार्यांना शुभेच्छा दिल्या.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.