शरद कृषीच्या विद्यार्थीनीची विद्यापीठ संघात निवड

 

जयसिंगपूर : विजय धंगेकर

दि १ जानेवारी .:जैनापूर (ता. शिरोळ) येथील शरद कृषि महाविद्यालयच्या कु. तेजस्विनी खोले ह्या विद्यार्थीनीची महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या बॅडमिंटन संघामध्ये निवड झाली आहे. भोपाळ येथे राजीव गांधी प्राद्योगिकीमध्ये 5 ते 8 जानेवारी 2022 ला होणा-या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.

संस्थेचे चेअरमन नामदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाहुबली माणगावे, क्रीडा शिक्षक प्रा. दादासाहेब मगदूम व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.