प्राजासत्ताक दिनाचे औचित्त साधून किर्तीनगर व्यायाम शाळेजवळ हळदी कुंकू समारंभ कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी:-महरुन्निसा साखरकर
 दि: २७ जानेवारी एकता महिला मंडळ किर्तीनगर रत्नागिरीतर्फे प्राजासत्ताक दिन निमित्ताने भव्य हळदीकुंकू कार्यक्रम किर्तीनगर व्यायाम शाळेजवळ आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमासाठी रत्नागिरी नगरपरिषदेच्या लाडल्या नगरसेवका कौशल्या शेट्ये,साप्ताहिक महालक्ष्मी टाइम्सच्या पत्रकार महरुन्निसा साखरकर उपस्थित होते.

             विसरुनी सारी कटुता,नात्यात तीळगुळाचा गोडवा यावा ,एकमेकांच्या साथीने हा आनंदाचा सोहळा रंगावा…सध्या कोरोनाच्या वातावरणात सगळ्यांच्या घरी आमंत्रण घेऊन जाणे सगळ्यांनाच शक्य होईल असे नाही.तरी आजची परिस्थिती लक्षात घेऊन दिनांक 26 जानेवारी रोजी किर्तीनगर व्यायाम शाळेजवळ हळदी कुंकू समारंभ आयोजीत करण्यात आला.किर्ती नगरच्या एकता महीला मंडळ यांनी एकत्र येऊन हळदी कुंकू समारंभ काळजीपूर्वक साजरी केला.

या समारंभाला उपस्थित सर्वांच्या लाडक्या आणि सर्व महिलांसोबत अगदी त्यांच्या मैत्रिणी सारख्या वागणाऱ्या सौ. कौशल्या केतन शेट्ये यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच दीप प्रज्वलन करुन या समारंभाला सुरूवात करण्यात आली. आणि सौ. कौशल्या शेट्ये यांच्या हस्ते हळदी कुंकू आणि वाण वाटप करण्यात आले. यावेळी मीनल सावंत, सुधा म्हेतरे,दिक्षा मेढेकर, मनीषा आगरे इत्यादी महिला उपस्थित होत्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.