इंदिरा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने प्रत्येक सभासदाला मिल्टन कंपनीचा थर्मास भेट

कबनूर : प्रतिनिधी
दि: २७ जानेवारी येथील इंदिरा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने प्रत्येक सभासदाला सन २०२०-२०२१ करीता मिल्टन कंपनीचा थर्मास भेटवस्तू म्हणून देण्यात आला. संस्थेच्या संचालकांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात सौ. हिरकणी अत्याळी, सौ. ज्योती प्रकाश पाटील, सुमन चौगुले, बाळासो बेनाडे, कुमार कोळी आदि सभासदाना कोरोना नियमावलीचे पालन करत वितरण करण्यात आले. संस्थेत ६५० सभासद असून प्रतिवर्षा प्रमाणे संस्थेने भेटवस्तू देण्याची परंपरा कायमपणे राखली आहे.
प्रथम संस्थेच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिना निमित्त संचालक विक्रांत दानोळीकर यांच्या हस्ते ध्वजपूजन करुन ध्वज फडकविण्यात आला. यावेळी अनिल कुलकर्णी, अनिल अलमलकर, अशोक वसगडे, आप्पासो कुंभार, महंमदयुनुस खतीब, धनंजय गोरे, दत्तात्रय भिलवडीकर, मारुती वाशीकर, सौ. लिलावती बनकर, सौ. पुष्पलता पाटील, सचिव शिवय्या जंगम आदि उपस्थित होते.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.