शिवसेनाप्रमुख सरसेनापती श्रीमान.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बॉक्स क्रिकेट सामने

 

मुंबई :-

हिरकणी प्रीमियर लीग २०२२ माहीम विधानसभेचे कार्यसम्राट विभागप्रमुख /आमदार श्री.सदा सरवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली, शाखा क्र.१९२ चे नवनिर्वाचित उपशाखाप्रमुख समीर कृष्‍णा गुरव आयोजित *हिरकणी प्रीमियर लीग २०२२ बॉक्स क्रिकेट* सामन्यांचे आयोजन हिरकणी इमारत येथील पटांगणात २६जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये एकूण आठ संघाने भाग घेतला होता.उपविजयी व विजयी संघास उपविभाग प्रमुख  यशवंत विचले यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे चषक देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी माहीम विधानसभा समन्वयक श्री.गिरीश धानुरकर,शाखा क्र.१९२ चे शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे,उपशाखाप्रमुख संतोष देवरुखकर,अजय कौसाले, उपशाखाप्रमुख समन्वयक प्रमोद गुढेकर,गटप्रमुख -अनिकेत जाधव, तसेच हिरकणी रहिवाशी संघाचे अध्यक्ष-श्री धनंजय कुवेसकर,सेक्रेटरी श्री.उत्तमराव माने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रकाश तरळ यांनी केले, तसेच व्यवस्थापन – हिरकणी क्रीडा मंडळाने केले. *या कार्यक्रमाचे आयोजन नवनिर्वाचित उपशाखाप्रमुख समीर कृष्णा गुरव यांनी केले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.