एस.टी बस स्थानकाचे रखडलेले काम लवकरच वेगाने मार्गी लावा

पालक व परिवहन मंत्री ना .अनिल परब यांच्या सूचना

रत्नागिरी: महरूनिसा साखरतर

दि: ३१ जानेवारी येथील एस.टी बस स्थानकाचे रखडलेले काम लवकरच वेगाने मार्गी लावा अशा सूचना जिल्ह्याचे पालक व परिवहन मंत्री ना .अनिल परब यांनी प्रशासनाला दिल्या असून यासंदर्भात संबंधितांची बैठक लवकरच होणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
26 जानेवारी ध्वजारोहणानंतर रत्नागिरीचे पालकमंत्री ना . अनिल परब यांनी एस.टी बस स्थानकास भेट दिली आणि रखडलेल्या कामाची पाहणी केली . सदरचे काम मार्गी लावण्यासाठी पुढील आठवड्यात ठेकेदार , अधिकारी आणि संबंधितांची बैठक घेतली जाईल असे सांगितले . 10 कोटी रुपये खर्च करून हे बस स्थानक उभारण्यात येणार असून त्याचे काम लवकरच मार्गी लागेल असेही ना .परब यांनी सांगितले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.