MH SET Result 2021: राज्य पात्रता परीक्षेत कडवईतील शशिकांत किंजळकर यांचे यश

संगमेश्वर:-मुजीब खान
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षा २६ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र व गोवा राज्यात घेण्यात आली होती. या परीक्षेला ७९ हजार ७७४ उमदेवार बसले होते. त्यापैकी पाच हजार २९७ उमेदवार उत्तीर्ण झाले यामध्ये कडवई किंजळकरवाडी येथील शशिकांत किजळकर यांनीदेखील यश संपादन केले. शशिकांत किंजळकर हे मराठी विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. किंजळकर हे भाईशा घोसाळकर हायस्कूल कडवई येथे मराठी विषयाचे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचा (MH SET Result 2021) निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत पाच हजार २९७ उमदेवार उत्तीर्ण झाले असून, त्याची टक्‍केवारी ६.६४ इतकी आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षा २६ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र व गोवा राज्यात घेण्यात आली होती. या परीक्षेला ७९ हजार ७७४ उमदेवार बसले होते. त्यापैकी पाच हजार २९७ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला अर्ज केलेल्यांपैकी ८१ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. यापूर्वी २७ डिसेंबर २०२०मध्ये घेण्यात आलेल्या सेट परीक्षेचा ६.७३ टक्‍के लागला होता. यंदाचा सेटचा निकाल ६.६४ टक्‍के इतका लागला आहे.
शशिकांत किंजळकर यांनी मिळवलेल्या यशामुळे कडवई परिसरात त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.