कडवई धरणाच्या पाण्यात म्हैशी जात असल्याने धरणाचे पाणी दूषित

कडवई :-
कडवई परिसरातील कडवई धरणातून पाणी पुरवठा योजनेवरील पांच (५) विहीरीवरुन गावांना पाण्याचा पुरवठा गेले कित्येक वर्षे होत आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या ५ विहीरीवरुन कडवई परिसरात पाणी पुरवठा योजनेने पाणी पोहोचते.मात्र या धरणाच्या पाण्यात तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बहुसंख्य म्हैशी दररोज असतात.वेळोवेळी ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतकडे तक्रारी अर्ज आले संबंधित म्हैशीच्या मालकाला वेळोवेळी ग्रामपंचायत कडून बोलावून समजावून सांगितले असुन देखील या मध्ये काही बदल झालेला दिसत नाही.

धरणाच्या पाण्यात म्हैशी दररोज जात असल्याने येथील असणाऱ्या विहीरीचे पाणी दूषित होत आहे. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा बेफिकीर आणि बेजबाबदार मालकावर सदोष मनुुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी संतप्त भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.