महापालिकेचा सहाय्यक आरोग्य निरीक्षक लाच स्वीकारताना कोल्हापूर एसीबीच्या जाळ्यात…
वैद्यकीय रजेचा अर्ज मंजूर करण्यासाठी मागितली होती एक हजाराची लाच
कोल्हापूर :प्रतिनिधी
दि: १ फेब्रुवारी सफाई कामगाराचा वैद्यकीय रजेचा अर्ज मंजूर करण्यासाठी १ हजाराची लाच घेताना आज महापालिकेचा सहाय्यक आरोग्य निरीक्षक दिलीप अनंतराव पाटणकर (वय ४९, रा. सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर) याला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले .
तक्रारदार याने आपला वैद्यकीय रजा मंजूर करावी यासाठी आरोग्य निरीक्षक दिलीप पाटणकर यांच्याकडे अर्ज दिला होता. सदर रजा अर्ज मंजूर करण्यासाठी पाटणकर याने तक्रारदाराकडे १ हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली . याची दखल घेत लाचलुचपत विभागाने सापळा रचून पाटणकर याला लाच घेताना रंगेहाथ पकडले.
सदरची कारवाई पोलीस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश मोरे,पो. ना. विकास माने,पो. ना. नवनाथ कदम, पो. ना. सुनील घोसाळकर,पो. कॉ. संदीप पडवळ, चालक.पो. हे. कॉ. सुरज अपराध यांनी केली.
Comments are closed.