मनेरे शिक्षण संकुला मध्येजागतिक महिला दिन’’ साजरा
इचलकरंजी: दिपक पाटील
दि. ९ मार्च श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ.कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्या मंदिर, मणेरे हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयात ८ मार्च “जागतिक महिला दिन’’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक मा. श्री. सुधाकरराव मणेरेसो, संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.सुभाष केटकाळे, व संस्थेचे मार्गदर्शक मा.श्री.संजय देशपांडे सर या मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.मा. श्री. सुधाकरराव मणेरेसो यांनी आपल्या मनोगतात “ थोर स्त्रियांच्या अगाध आत्मशक्तीची महती व्यक्त केली ”, “आजच्या आधुनिक युगातील स्त्रियांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले कार्य करावे व स्त्रियांचा अभिमान राखावा”. असे विचार व्यक्त केले.
यावेळी शिक्षक मनोगतात कु.प्रतिभा नराटे यांनी जागतिक महिला दिनाविषयी माहिती दिली .तसेच विद्यालयातील विद्यार्थिनिंनी महिलांच्या कार्याविषयी आपले मत मांडले .कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ.प्रेमा कांबळे व आभार कु.संगीता कुंभार यांनी केले.यावेळी हायस्कूल प्राचार्या सौ.उर्मिला माने, प्राथ.मुख्याध्यापिका कु.तसलिम मणेर, उपमुख्याध्यापिका सौ.पुष्पा ऐनापुरे, बालवाडी प्रमुख सौ.स्वाती ढेकळे, कॉलेज इनचार्ज श्री.मलिक मणेर सर, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.