पोवाडा, भारूड व गवळणीच्या माध्यमातून शासकीय योजनांचा गावागावात जागर
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि. 10 : राज्य सरकारच्या द्विवर्ष पूर्ती निमित्त लोककलांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. यासाठी कला पथकातील कलावंतांकडून पोवाडा, भारुड गवळण व बतावणीच्या माध्यमातून शासकीय योजनांचा गावागावात जागर केला जात आहे व यास ग्रामस्थांचांही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयातर्फे कलापथकांच्या माध्यमातून शासकीय योजनांचा गावागावांत जागर करण्यात येत आहे. कलापथकांचे हे कार्यक्रम जिल्ह्यात 9 मार्चपासून सुरु झाले आहेत.
आज आदित्य ग्राम जीवन सामाजिक संस्थेने चंदगड ढोलकरवाडी, नागनवाडी, हेरे ग्रामपंचायत येथे व नगरपंचायत चंदगड येथे कार्यक्रम करुन शासकीय योजनांवर आधारित कार्यक्रमांचे सादरीकरण केले. यावेळी त्या-त्या गावचे सरपंच, पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाहीर प्रकाश गणपती लोहार, लोककला कला क्रीडा सांस्कृतिक बहुउद्देशीय मंडळ यांनी सांगरुळ, ता. करवीर प कोडोली, ता. पन्हाळा येथे कार्यक्रम करुन शासकीय योजनांवर आधारित कार्यक्रमांचे सादरीकरण केले. यावेळी त्या-त्या गावचे सरपंच, पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाहीरी पोवाडा कलामंच यांनी कसबा तारळे, ता. राधानगरी व तालुका राधानगरी येथे कार्यक्रम करुन शासकीय योजनांवर आधारित कार्यक्रमांचे सादरीकरण केले. यावेळी त्या-त्या गावचे सरपंच, पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.