आमदार प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

इचलकरंजी  : संजय आंबे
दिय. १० मार्च हुपरी येथील जवाहर साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक, माजी वस्त्रोद्योग मंत्री तथा आमदार प्रकाश आवाडे यांचा 69 वा वाढदिवस 15 मार्च 2022 रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त जवाहर कारखान्याच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण आणि कारखान्याच्या सर्व अधिकारी-कर्मचारी व कामगारांसाठी 5 लाख रुपयांची नागरिक सुरक्षा विमा ही महत्वाकांक्षी योजना सुरु करण्यात येणार आहे. प्रती व्यक्ती वार्षिक 500 रूपये हप्त्यापैकी 50 टक्के हिस्सा कारखाना आदा करणार असून 50 टक्के संबंधित कामगारांच्या पगारातून कपात केली जाणार आहे. या विमा योजनेमुळे विमाधारक कामगारांस विमा सुरु केलेल्या दिवसापासून एक वर्षापर्यंत कामावर असताना किंवा नसतानादेखील होणारे अपघात व अपंगत्व आल्यास 5 लाख रुपये विमा रकम मिळणार आहे. या लाभाशिवाय रूपये 1 लाखापर्यंत वैद्यकीय उपचारासाठी मिळणार आहेत. सध्या कारखान्यातील सर्व कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी युनिव्हर्सल हेल्थ मेडीक्लेम योजना सुरु आहे. सदर योजनेतून मिळणार्‍या लाभाची रक्कम तुटपुंजी असल्याने नागरिक सुरक्षा विमा योजना सुरु करण्यात येत आहे.
सध्या कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना हृदयविकार, कॅन्सरवरील उपचारासाठी व मूत्रपिंड रोपणासाठी 50 हजार रुपये, मूत्रपिंड शस्त्रक्रिया व डायलेसिस उपचारासाठी 30 हजार रुपये तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 3 हजार रुपये इतक्या रकमेची वैद्यकीय मदत कारखान्याच्या स्वनिधीतून आदा करण्यात येते. आतापर्यंत सदर योजनेतून सभासदांना 20 कोटी रुपयापर्यंत वैद्यकीय अर्थसहाय्य दिले आहे.
आमदार प्रकाश आवाडे यांच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त या हंगामात कारखान्याकडे ऊस तोडणी वाहतूक कामासाठी कंत्राटदारांमार्फत कार्यस्थळावर आलेल्या सर्व मजूरांसाठी हिवताप, डेंग्यू आजाराची मोफत तपासणी, मजूरांच्या गरोदर महिलांची व बालकांची आरोग्य तपासणी व आवश्यक औषधोपचार मोफत देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे कारखान्याने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.