प्रा. मेजर के. एम. भोसले यांनी शिक्षक सेवेत सामाजिक बांधिलकी जोपासली

आरोग्य राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे प्रतिपादन

शिरोळ : प्रतिनिधी
दि . १ एप्रिल प्रा. मेजर के. एम. भोसले यांनी शिक्षक सेवेत सामाजिक बांधिलकी जोपासली. त्यांच्या हातून देशाच्या रक्षणासाठी अनेक विद्यार्थी घडविले. त्यामुळे अनेक क्षेत्रात त्यांचे विद्यार्थी उच्च स्थानावर कार्यरत आहेत. त्यांचे समाजाप्रति असलेली तळमळ व शैक्षणिक कार्य आजच्या पिढीला दिशादर्शक व प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले. येथील समर्थ मंगल कार्यालयात प्रा. मेजर काशीनाथ महादेव भोसले यांच्या एकसष्ठीनिमित्त सत्कार सोहळा संपन्न झाला कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते के एम भोसले यांना गौरव समितीच्यावतीने मानपत्र, शाल, श्रीफळ व पगडी देवून गौरविण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात माजी खासदार श्रीमती. निवेदिता माने म्हणाल्या की, प्रा. के. एम. भोसले हे स्व. गजाननराव (बापू) पाटील व लोकनेते स्व. बाळासाहेब माने यांच्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते आहेत. रूकडी येथील संभाजीराव माने गर्ल्स हायस्कूलमध्ये त्यांनी 32 वर्षे उत्कृष्ट सेवा बजावली. त्यांची संस्था, शिक्षक, विद्यार्थी यांच्या प्रगतीबाबत असलेली तळमळ आणि आदर ही गोष्ट अभिमानास्पद आहे. शिक्षकी पेशा सांभाळत मौजे आगर येथे त्यांचे सुरू असलेले शैक्षणिक कार्य प्रेरणादायी आहे. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण इंगवले शिक्षक राजू मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पृथ्वीचंद माच्छेकर यांच्या सहकार्‍यांनी मनोरंजनाचा कार्यक्रम केला. यावेळी प्रा. के. एम. भोसले यांच्या कार्याचा आढावा घेणारा बहुआयामी के. एम. या गौरव अंकाचे व रविंद्र खाडे यांच्या ‘दादा’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक खंडेराव जगदाळे यांनी स्वागत केले. अ‍ॅड. श्रीकांत माळकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार सुनिल इनामदार, दत्तात्रय खडके, सयाजी शिंदे,मराठा पतसंस्थेचे चेअरमन प्रा.रवींद्र पाटील,महेश कुंभार,अरूण जगदाळे यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास आमदार जयंत आसगावकर,विक्रमसिंह सावंत,माजी आमदार. उल्हास पाटील,दत्त कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव पाटील, संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, भाजपाचे नेते अनिलराव यादव, शिवप्रतिष्ठानचे रावसाहेब देसाई, माजी जि.प. सदस्य डॉ अशोकराव माने, विजयसिंह पाटील शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शहाजीराव दाभाडे, मौजे आगरचे सरपंच अमोल चव्हाण,पत्रकार डी .आर पाटील , बाळासाहेब माळी ,दगडू माने डेबॉन्स उद्योग समुहाचे बाळासाहेब भांदिगरे, सुभाषसिंग रजपूत, शिरोळचे उपनगराध्यक्ष तातोबा पाटील, नगरसेवक प्रकाश गावडे, श्रीवर्धन देशमुख, इम्रान अत्तार, पंडीतराव काळे, एन. वाय. जाधव, प्रा. चंद्रकांत मोरे, पृथ्वीराज यादव विजय आरगे संजय शिंदे, मुकूंद गावडे, माजी नगरसेवक दादासो कोळी तसेच त्यांचे बंधू उत्तम भोसले, निनाद भोसले तसेच भोसले कुटूंबातील सदस्य, नातलग व शिरोळ, रूकडी तसेच मौजे आगर भाग विजयसिंह शिक्षण प्रसारक मंडळचे सर्व संचालक शिक्षक, कर्मचारी व परिसरातील मान्यवर उपस्थित होते.सुत्रसंचालन महेश घोटणे यांनी केले आभार नितीन बागुल यांनी मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.