21 ते 25 एप्रिल पासून रोटरी ट्रेडफेअरचे भव्य आयोजन

इचलकरंजी: विजय मकोटे

दि. १५ एपिल :रोटरी ट्रेडफेअर हे प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्यावतीने व माध्यम प्रायोजक दै महासत्ताच्या सहकार्याने 21 ते 25 एप्रिल 2022 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळयानजीक केएटीपी ग्राउंड या इचलकरंजीतील मध्यवर्ती ठिकाणी सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत भव्यपणे साकारत आहे या वर्षाचे रोटरी ट्रेडफेअरचे 21 वे वर्ष आहे. इचलकरजीच्या एकमेव पसंतीचे व ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभणारे हे प्रदर्शन याही वर्षी दिमाखात साकारणार आहे. यातून मिळणारी रक्कम ही वर्षभर विविध समाजउपयोगी कार्यक्रमासाठी वापरली जाते. गरजू लोकांना मदत, प्लॅस्टिक सर्जरी शिबिर, विविध शाळांना कॉम्प्युटर, बेंचेस, स्वच्छतागृह. डोळयाचे ऑपरेशन, विविध वक्त्यांची व्याख्याने ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलने, विविध वैदयकीय तपासणीद्वारा गरजू लोकांना मदत, रक्तदान शिबिर, प्रशिक्षण शिबिरे व इतर उपक्रम घेतले जातात.

या वर्षी लेडीज व जेंट्स डेस मटेरियल, आर्टीफिशियल ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गृहोपयोगी उत्पादने, मोबाईल दुचाकी व चारचाकी वाहने विभाग, वॉटर प्युरिफायर इ चे स्वतंत्र विभाग मांडणेत येणार आहेत. खवय्यांसाठी शुध्द शाकाहारी अत्यंत लज्जतदार व हायजेनिक पद्धतीने बनविलेले खादयपदार्थांचे विविध प्रकार असून विजया कॅटरर्स यांचे फूड स्टॉल असणार आहेत. आईस्किम, ज्यूस, फ्रूट स्टॉल तसेच मनोरंजनाचे विविध कार्यक्रम, मुलांच्याकरिता मिनि वर्ल्ड असणार आहेत.

या प्रदर्शनामध्ये स्टॉलची सुबक मांडणी केली असून, नागरिकांना प्रदर्शन पाहणेकरिता रुंद व प्रशस्त रस्ते, आधुनिक भव्य मंडप, संपूर्ण परिसर मॅटीनने आच्छादित तसेच चोविस तास विशेष सुरक्षा, स्टेज शो कराओके गाणी मिमिकी चे उत्कृष्ठ कार्यक्रम, आकर्षक बक्षिसांची लकी ड्रॉ इ चे आयोजन ही यावर्षीची खास वैशिष्टे आहेत.

यावर्षीही महीलांच्या करिता विविध स्पर्धाचे आयोजन केले आहे. यामध्ये शुक्रवार दि 22/04/2022 रोजी दु.03.00 वा हेअर स्टार हॉटेल सेंटल पार्क येथे ठिपकयांची रांगोळी स्पर्धा होईल, शनि दि 23/04/2022 रोजी अरेबियन मेहंदी स्पर्धा दु:03.00 वा तर हेअर स्टाईल स्पर्धा दु 4.00 वा रोटरी ट्रेडफेअर केएटीपी ग्राउंड या ठिकाणी होतील. रविवार दि.24/04/2022 दु 03.00 वा पाककला स्पर्धा (बेसन / हरभरा डाळीचे तिखट व गोड पदार्थ ) केएटीपी ग्राउंड येथे होतील.

यामध्ये सहकार महषी मा कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांना रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीतर्फे इचलकरंजी समाजभूषण पुरस्कार देवून सत्कार करण्यात येणार आहे. सदरचा कार्यक्रम सोमवार दि 25 एप्रिल 2022 रोजी सायं 7.00 वा रोटरी ट्रेडकेअरमध्ये होणार आहे. अशी माहीती अध्यक्ष प्रकाश रावळ यांनी दिली

इचलकरंजी व परिसरातील व्यावसायिक, उत्पादक, विक्रेते, संस्था यांना आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवणेची ही इचलकरंजीतील एकमेव व उत्तम पर्वणी आहे. स्टॉल बुकींगकरिता रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी क्लबचे अध्यक्ष प्रकाश रावळ (7776826600), सेक्रेटरी संजय घायतिडक (9326605212). रोटरी ट्रेडफेअरचे चेअरमन सत्यनारायण धूत (8830835709), को- चेअरमन रविंद्र नाकील (9225807294), स्टॉल प्रमोशन मुकेश जैन / इंडिया (9325700145) यांच्याशी संपर्क साधावा.

या ट्रेडफेअरमध्ये जवळजवळ एक ते दीड लाख लोक भेट देतात. तरी ज्यांना आपली प्रॉडक्टची, व्यवसायाच्या बॅनरची जाहीरात करावयाची असेल त्यांनी 9822878824, 8830835709 या नंबरवर संपर्क साधावा. असे आवाहन रोटरी क्लब च्या वतीने करण्यात आले

या पत्रकार परिषदेत रोटरीचे अध्यक्ष प्रकाश रावळ, सेकेटरी संजय घायतिङक, ट्रेडफेअरचे चेअरमन सत्यनारायण धूत सेक्रेटरी अभय यळरूटे, प्रकाश गौड, मुकेश जैन, बसंत पाटील, मनिष मुनोत, अजित कुरडे, महेंद्र मुथा, विक्रम बुचडे, नेमिनाथ -कोथळे, आनंदा माधव, महेश दाते, महादेव खारगे आदि रोटेरियन उपस्थिते

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.