मोटारसायकल चोरीतील ३ आरोपी जेरबंद

2लाख 30हजार रु किमतीच्या ६ मोटारसायकल जप्त करणेत जयसिंगपुर पोलीस यश

जयसिंगपुर : विजय घंगेकर

दि. २६ एप्रिल : जयसिंगपुर पोलीस ठाणेत दाखल असलेल्या चोरीच्या गुन्हातील चोरीच्या मोटर सायकलीचा शोध घेण्यास जयसिंगपूर पोलिसांना यश मिळाले असून ३ चोरट्यांना ताब्यात घेवून त्यांच्या कडून २ लाख ३० हजार किंमतीच्या ६ मोटर सायकल ताब्यात घेतले आहे .

जयसिंगपूर पोलिस ठाणे अंतर्गत गु.र.नं. १३२/२०२२, १३३/२०२२, १३७/२०२२ भा.द.वि.स.कलम ३७९ प्रमाणे मोटारसायकलचे चोरीचे गुन्हे दाखल होते. त्याअनुषंगाने मा.पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे साो, मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती जयश्री गायकवाड ( गडहिंग्लज विभाग ), उपविभागिय पोलीस अधिकारी मा. श्री. रामेश्वर वैंजणे यांचे मार्गदर्शनाखाली मा.पोलीस निरिक्षक राजेंद्र मस्के, यांनी आदेशीत केलेने जयसिंगपुर शहरात पेट्रोलिंग करित असताना दि. २६/०४/२०२२ रोजी रात्रौ ०१.०० वा चे सुमारास पो. कॉ. १३३३ रोहीत डावाळे यांना गल्ली क्रं १२ जोतिर्लिंग मेडीकील जवळ तीन इसम संशयीतरित्या फिरत असताना मिळुन आले त्याना ताब्यात घेवुन त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची  नावे वैभव रामचंद्र बोडके व.व. ३२ रा. आपटेनगर कोल्हापुर,,संदीप बाळासाहेब पोतदार व.व.३० रा.शिरदवाड ता.शिरोळ व रोहीत विलास पोतदार रा. आपटेनगर कोल्हापुर असे सांगितले त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी वरील दाखल असलेले गुन्हयातील मोटारसायकल या चोरी केल्या आहेत असे सांगितले त्यांच्या कडून सदर मोटरसायकल व इतर दोन मोटार सायकल व गुन्हयात वापरलेली एक मोटारसायकल अशा एकुण २, लाख३० हजार रु किमतीच्या ६ मोटारसायकली त्यांच्याकडून जप्त केल्या आहेत

सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे साो, मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, उपविभागिय पोलीस अधिकारी मा. श्री. रामेश्वर वैंजणे यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरिक्षक राजेंद्र मस्के पोसई प्रमोद वाघ, सहा.फौजदार सोमनाथ चळचुक, पो.हे.कॉ. १२५३ अंजना बन्ने, म.पो.हे.कॉ.७८० साहिरा मुल्ला, २९० स्मिता कांबळे, पो.कॉ. ८८५ संदेश शेटे, पो.कॉ. १३३३ रोहीत डावाळे, १३३७ विजय पाटील, पो.कॉ. २५४५ सागर सुर्यवंशी, बाबाचाँद पटेल , अभिजीत भातमारे , होमगार्ड राकेश माने, हुसेन जतकर, मिलिंद शिंगाडे आदि पथकांने कारवाई केली आहे तसेच पोलीस मित्र संग्राम रजपुत, समीर मुल्ला, दिपक नाईक, अक्षय भजनावळे, साजीद मुल्ला, मारुती जांगडे, दादु वाघमोडे यांचे तपासकामात मोलाचे सहकार्य लाभले. यातील आरोपी क्रं १ हा हॉटेल व्यवसायिक असुन त्याचेकडे चोरी करणेचे कारण विचारले असता त्याने कर्जापोटी चोरी केलेचे कबुल केले आहे. अधिक तपास स पो.नि सोमनाथ चळचूक करत आहेत .

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.