शरद इंजिनिअरिंगमध्ये 25 मे रोजी इनोव्हेशन’ स्पर्धा
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा : हजारो स्पर्धकांचा सहभाग
यड्राव : विजय धंगेकर
दि. 23 यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये बुधुवार (ता.25) मे रोजी इनोव्हेशन 2022 या राष्ट्रीय स्तरावरील टेक्निकल स्पर्धेच आयोजन केले आहे. विजेत्यांना संस्थेमार्फत प्रमाणपत्रसह एक लाख रूपयांपेक्षा अधिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन अडोप्ट कन्संलटंट पार्टनर नरेंद्र माटे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे आहेत.
पेपर प्रेझेन्टेशनमध्ये सर्व विभागातील विविध विषयावर शोध निबंध सादरीकरण होणार आहे. प्रोजेक्ट कॉम्पीटेशनमध्ये विविध विषयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पाचे सादरीकरणाच्या स्पर्धा होतील. टेक्नीकल पोस्टर प्रेझेंटेशन, कॅम्पस फॉर यू, पायथॉन क्र्यू, रोबो रेस, कोड ट्रिक्स, स्ट्रक्चर मॅनिया अशा यामध्ये प्रोजेक्ट कॉम्पीटेशन, पेपर प्रेझेन्टेशन यासह 6 पेक्षा अधिक विविध स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेतील विविध स्पर्धा होणार आहेत.
आतापर्यंत देशभरातील शेकडो स्पर्धकांनी सहभाग नोदवला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व अभ्यासाबरोबर तांत्रिक व प्रात्यक्षिक ज्ञान अवगत व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे सर्व नियोजन संयोजक डॉ. शबनम शिकलगार, डॉ. व्हि.के. नाईक यांच्यासह प्रा. संग्राम डोपरे, डॉ. व्हि.एस. हजारे, प्रा. सुयोग पाटील, प्रा. व्हि.व्हि. खंदारे, प्रा. पी.पी. लंगडे, प्रा. सी. एस. पाटील, डॉ. एस.बी. माळी, प्रा. एम.ए.जाधव व विद्यार्थ्यांनी केले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.