हरियाणा येथे होणाऱ्या ४ थ्या खेलो इंडिया युथ स्पर्धेमध्ये गंगामाईच्या सेजल सुतार ची निवड
इचलकंरजी : विजय मकोटे
दि. २६ मे श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची इयत्ता दहावी मध्ये शिकणारी कुमारी सेजल सुनील सुतार ची ४ थ्या खेलो इंडिया युथ स्पर्धेमध्ये योगासन स्पध्येसाठी निवड झाली .
यापूर्वीच्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत कुमारी सेजल ने उज्वल यश संपादन केले आहे
स्पर्धेला जाण्यापुर्वी संस्थेचे प्रेसिडेंट मा . श्रीनिवासशेठजी बोहरा व जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ.चंद्रशेखर साखरे व क्रीडा शिक्षक श्री शेखर शहा व सुहास पोवळे यांच्या उपस्थित तिला पुष्पगुच्छ देऊन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या
श्री ना.बा. एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री हरीशजी बोहरा , व्हाईस चेअरमन मा. श्री उदयजी लोखंडेसो ट्रेझझर राजगोपालजी डाळ्या, सेक्रेटरी श्री बाबासाहेब वडींगेसो स्कूल कमिटी चेअरमन श्री मारुतराव निमणकर या पदाधिकाऱ्यांनी सेजलचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका श्रीमती गोंदकर एस. एस. , उपप्राचार्य श्री पाटील आर. एस. , उपमुख्याध्यापिका सौ भस्मे एस.एस. व पर्यवेक्षक श्री कांबळे व्ही. एन यांनी सेजलचे अभिनंदन केले
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.