मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाच्या कामाची माती नदीच्या पात्रात

कडवई:- सचीन पाटोळे

दि. २९ मे.मुंबई गोवा महामार्गाच्या (NH-66) रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. संगमेश्वर तालुक्यातील मौजे तुरळ गावालगत कडवई गाव आहे.तुरळ-कडवई सिमेवरुन पावसाळ्यात नदी वाहत असते.जास्त प्रमाणात पाऊस पडल्यास मौजे कडवई येथील साळवी वाडी,दहिवलकर वाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी भरते.त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असते.

सध्या मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र ६६ चे काम वेगाने चालू आहे. महामार्गाचे काम होत असताना महामार्गावरील माती कडवई साळवी वाडी व दहिवलकर वाडी येथील नदी पात्रात टाकली जात आहे. यामुळे सध्या पावसाळा जवळ असल्याने पावसाळ्यात नदीचा प्रवाह बदलून शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात माती जाऊन नुकसान होऊ शकते. तरी याकडे संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकारी वर्गाने त्वरित लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.