ऊस भुषण 2019 -2020 चा पुरस्कारश्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे सभासद व प्रगतशिल शेतकरी श्री प्रकाश विलास जाधव यांना प्रदान

केंदीय कृषीमंत्री खा. शरद पवार व ना. राजेश टाेपे यांच्या हस्ते प्रदान

शिरोळ : विजय घंगेकर
दि. ६जून :वसंतरावदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट यांच्या मार्फत देण्यात येणारा ऊस भुषण 2019 -2020 चा पुरस्कार श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे सभासद व प्रगतशिल शेतकरी श्री प्रकाश विलास जाधव यांना माजी केंदीय कृषीमंत्री खा. शरद पवार साहेब व ना. राजेश टाेपे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.एकरी 159 टनाचे विक्रमी उत्पादन घेतल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.

प्रकाश जाधव यांनी औरवाड येथे आपल्या क्षेत्रात को 86032 जातीच्या उसाची लागवड केली होती पाच फूट सरींची रुंदी ठेवून ठिबक सिंचनाद्वारे खात व पाणी व्यवस्थापन केले होते.सरासरी ४६ ते ४७ कांड्या झालेल्या होत्या तसेच उसाचे वजन चार किलोच्या आसपास पडले त्यामुळे एकरी 159 टनाचे उद्दिष्ट साध्य करता आले श्री दत्त काराखान्याच्या माध्यमातून वेळोवेळी ऊस विकास योजनेअंतर्गत शेतकर्याना उत्पादन वाढीसाठी मार्गदशन शिबीर तसेच कार्यशाळा आयोजित केल्या जातात त्याचा कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी लाभ घेत असतात. कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकरयांचे हित लक्षात घेऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम कारखाना व्यवस्थापनामार्फत नेहमीच सुरु असते अन ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा हिरीरीने ऊस विकास योजनेच्या उपक्रमात भाग घेत असतात.
या कार्यक्रमावेळी श्री दत्त शे. सह. साखर कारखाना ली. शिरोळ चे चेअरमन उद्यान पंडित मा. गणपतराव पाटील दादा  व शेती अधिकारी मा. श्रीशैल्य हेगान्ना तसेच ऊस विकास अधिकारी मा. दिलीप जाधव व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.