प्रा.केशव पाखरे यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्रदान:

जयसिंगपूर : विजय घंगेकर

दि. ९जून :प्रा.केशव शाम पाखरे यांना शिवाजी विद्यापीठाकडून रसायनशास्त्र विषयात पीएचडी ही मानाची पदवी प्राप्त झाली. “स्टडीज ऑन गॅस सेन्सिटीव्हीटी ऑफ केमिकली सिंथेसाइज्ड टीन ऑक्साइड –झिंक ऑक्साइड नॅनोकाम्पोझिट”  हा त्यांच्या पी.एचडी चा मुख्य विषय होता. डॉ. पाखरे यांना पी.एचडी मार्गदर्शक म्हणून जयसिंगपूर कॉलेजचे उपप्राचार्य व रसायनशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉ. बी. एम. सरगर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. याचबरोबर रसायनशास्त्र विभागातील सर्व स्टाफ चे सहकार्य लाभले.
डॉ. पाखरे यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये १८ हुन अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत तर आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेमध्ये १५ हुन अधिक ठिकाणी आपले संशोधन सादर केले आहे.
सध्या वातावरणामध्ये वाढणारे प्रदूषण लक्षात घेता डॉ.पाखरे यांनी प्रोफेसर डॉ.सरगर यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर कॉलेजमधील रसायनशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत  रासायनिक अभिक्रिया विकसित करुन अधिक कार्यक्षम नॅनोकाम्पोझिट तयार केले. हे नॅनो-काम्पोझिट वातावरणातील इथेनोल, एलपीजी, हायड्रोजन सल्फाईड, अमोनिया यासारख्या ज्वलनशील व विषारी वायूंना गॅससेन्सरच्या मदतीने ओळखण्यासाठी अधिक कार्यक्षम ठरत आहे.
डॉ. पाखरे हे सध्या वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे आर्टस्, कॉमर्स व सायन्स महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावर अध्यापनाचे काम करीत आहेत. डॉ. पाखरे यांना पीएचडी पदवी प्राप्त झाल्याबद्दल अनेकांत एज्यूकेशन सोसायटी, जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, सचिव महावीर अक्कोळे व खजिनदार पापा पाटील व सर्व सदस्य तसेच जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरच्या प्राचार्या प्रोफेसर डॉ. मनीषा काळे यांनी अभिनंदन केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.