राजधानीत वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

नवी दिल्ली : प्रतिनिधी

दि 1 : हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.

            कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त (अ.का) डॉ. निरुपमा डांगे  यांनी  वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्‍यांनीही  प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 

महाराष्ट्र परिचय केंद्रात वसंतराव नाईक यांना अभिवादन

            महाराष्ट्र परिचय केंद्रात वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक(अ.का) अमरज्योतकौर अरोरा यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  कार्यालयात  उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्‍यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली  वाहिली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.