डीकेटीईच्या गौरी मुग या विद्यार्थीनीला नेदरलँडमध्ये टेक्स्टाईल मधील संशोधनासाठी पुरस्कार प्राप्त
इचलकरंजी : विजय मकोटे
ता. २१ जुलै ः डीकेटीईमध्ये टेक्स्टाईलमधील फॅशन टेकनॉलॉजीमध्ये तृतीय वर्षात शिकणारी विद्यार्थ्यांनी गौरी मुग आणि तीच्या संघाला ‘ब्ल्यूटूथ कनेक्टीव्हीटीसह टच सेन्सेटीव्ह टेक्स्टाईल‘ या प्रकल्पासाठी नेदरलँडमधील सर्वात मोठया सेरेनडीपीटी अॅवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारामुळे डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनीने जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. गौरी मुग च्या प्रोजेक्ट टीमला नेदरलँड मधील सर्वात मोठया नॉलेज फेस्टीवल मध्ये सॅक्सीयन च्या स्मार्ट सोल्युशन सेमिस्टर कमिटी आणि सॅक्सीयन सेंटर ऑफ इंटरप्रिनरशीप यांच्या व्दारे सेरेनडीपीटी या अॅवॉर्डसाठी नामांकन मिळाले. त्यानंतर त्यांना ज्युरी व गुंतवणूकदार यांच्या समोर आपला प्रकल्प मांडण्याची संधी मिळाली. या प्रकल्पामध्ये टेक्स्टाईल मधील गौरी मुग ही एकमेव विद्यार्थीनी असल्यामुळे प्रकल्पाचे प्रोटो टाईप बनवण्यापर्यतची सर्व जबाबदारी तिच्यावरच होती. या प्रकल्पाचे ज्युरी व गुंतवणूक दारांनी गौरी चे अभिनंदन केले व तीला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
डीकेटीईची विद्यार्थ्यांनी गौरी मुग ही क्रेडिट ट्रान्सफर स्कीम अंतर्गत एका सेमिस्टरसाठी सेक्सिऑन युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस, नेदरलँड मध्ये शिक्षण घेत आहे. डीकेटीईचे २६ हून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी शैक्षणिक सामंजस्य करार झालेले आहेत. या अंतर्गत सेक्सिऑन युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस, नेदरलँड यांच्याशी देखील शैक्षणिक करार झालेला आहे. सेक्सिऑन युनिव्हर्सिटी ही नेदरलँड येथील उच्च शिक्षणासाठी नामांकित विद्यापीठ आहे. याआधीही डीकेटीईचे विद्यार्थी सेमीस्टर एक्सचेंज अंतर्गत परदेशात शिक्षण संपादन करुन यशस्वी झाले आहेत. विद्यार्थी देवाण-घेवाण, उच्च शिक्षणाच्या संधीचे देवाण-घेवाण, तसेच एकत्रित संशोधन करणे, सेमिनार व कार्यशाळा आयोजित करणे अशा अनेक बाबींवर कराराचे दोहोंमध्ये शिक्कामोर्तब झाले आहे.याअंतर्गत विद्यार्थी नेदरलँड येथील असलेल्या आधुनिक शैक्षणिक सुविधा यांचा लाभ घेवून विविध इंडस्ट्रीयल संशोधनात्मक प्रकल्पावर तज्ञ प्राध्यापक मार्गदर्शनाअंतर्गत काम करतात. यामुळे विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती होते आणि देशात व परदेशात त्यांना करिअरच्या अनेक क्षेत्रात काम करण्यासाठी संधी उपलब्ध होतात.
यशस्वी विद्यार्थीनीचे डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे सर्व ट्रस्टी यांनी अभिनंदन केले. सदर यशस्वी विद्यार्थीनीस संस्थेचे संचालक प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील व प्रा.डॉ. एल.जी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.