इंदूमती आवाडे (आऊ) यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त अभिवादन

हुपरी, : प्रतिनिधी

दि. २५ जुलै : कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडेदादा यांच्या पत्नी सौ. इंदूमती आवाडे (आऊ) यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त कारखाना कार्यस्थळावर कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे चीफ इंजिनिअर अॅन्ड फॅक्टरी मॅनेजर विकास कवडे, सीईओ (अकौंटस्) बबलू कलावंत, मुख्य शेती अधिकारी किरण कांबळे, चीफ केमिस्ट एन. एस. पाटील, चीफ इंजिनिअर इलेक्ट्रीक अॅन्ड इलेक्ट्रॉनिक रमेश मिठारी, परचेस ऑफिसर आर. बी. वठारे, लेबर अॅन्ड वेल्फेअर ऑफिसर अनिल वलशेट्टी, सिव्हील इंजिनिअर सुदेश मोरे, मेडीकल ऑफिसर डॉ. उमेश माने, कामगार युनियन अध्यक्ष सर्जेराव हळदकर इत्यादी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
कल्लाप्पाण्णा आवाडेदादांच्या सहचारणी म्हणून सौ. इंदूमती आवाडे (आऊ) यांनी उत्तम साथ दिल्यामुळे आवाडेदादांनी राजकारणाबरोबरच सहकार, शिक्षण, क्रिडा अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली. कारखान्यास ऊस पुरवठा करणारे शेतकरी, कामगार यांची मनापासून तळमळ असणाऱ्या सौ. इंदूमती आवाडे (आऊ) यांची कारखान्याच्या प्रत्येक धार्मिक कार्यात कल्लाप्पाण्णा आवाडेदादांच्या बरोबर त्यांची साथ होती. अशा कुटुंबवत्सल आणि प्रेमळ मनाच्या सौ. इंदूमती आवाडे (आऊ) यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर परिवारातर्फे अभिवादन करण्यात आले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.