बिरला शक्ती सिमेंट च्या विक्रेत्यांचा मेळावा संपन्न

सांगली : प्रतिनिधी
दि. २३ बिरला शक्ती सिमेंट च्या सांगली जिल्ह्याच्या विक्रेत्यांचा मेळावा व बिरला शक्ती सिमेंट ची सर्वाधिक उच्चांकी सिमेंट विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा पुरस्कार वितरण सोहळा आमदार मा श्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शुभहस्ते पार पडला. कार्यक्रमाला बिरला शक्ती सिमेंट चे नॅशनल सेल्स हेड मुद्दसर शेख, रिजनल सेल्स मॅनेजर निशाद जोशी, टेक्निकल इंचार्ज आशिष मांडे, सेल्स प्रमोटर नितीन धूत, ब्रँच मॅनेजर जयवंत लोखंडे, असि. मॅनेजर शादाब शिलेदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक सेल्स हेड मुद्दसर शेख यांनी करत कंपनीमार्फत गेल्या दोन वर्षामध्ये विक्रेत्यांसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली व कंपनीला सर्व विक्रेते, डिलर यांनी दिलेली साथ बहुमूल्य असून इथून पुढच्या काळातही आपण अशीच साथ द्यावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
आमदार मा श्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपले विचार मांडताना केसोराम इंडस्ट्रीज व बिरला शक्ती सिमेंट ने गुणवत्ता, दर्जा व उत्कृष्ठ सेवेच्या जोरावर केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे असे गौरोवोद्गार काढले. त्याचबरोबर सिमेंट क्षेत्रामध्ये सदैव अग्रेसर राहण्यासाठी त्यांनी कंपनीच्या डिलर व विक्रेत्यांना शुभेच्छा दिल्या.
बिरला शक्ती सिमेंटची उच्चांकी विक्री केल्याबद्दल सांगली जिल्हा विनायक ठोंबरे, असिफ घोरी, विनोद कांकाणी, प्रसाद रेपे, दिपक पैलवान, विकास चौगुले, अजित जाधव, रमजान ढालाईत, श्रीकांत तिकोळे आदी विक्रेत्यांना इमर्जिंग रिटेलर या पुरस्काराने मा. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. उपस्थितांचे आभार शादाब शिलेदार यांनी मानले.
सदर प्रसंगी डिलर करण बाफना, श्याम मालू, दिपक मालू, विनोद साळुंखे, शिरीष शेटे, चेतन बोथरा, गोपाळ राठी, मनोज रायगांधी, उदय मुळीक, अस्लम मुल्ला, शितल पाचोरे, मिथुन कोळी, सुनील शहा, सचिन बागणे, सतीश मूर्ती यांच्यासह अन्य मान्यवर डिलर उपस्थित होते. त्याचबरोबर सदर विक्रेता मेळाव्यास ६०० हून अधिक विक्रेते व बिरला शक्ती सिमेंट चे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.