समान संधी केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना समुपदेशन…

इचलकरंजी : विजय घंगेकर

दि. १९ येथील डी .के. ए. एस .सी. महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या विविध स्कॉलरशिप ,फ्रीशिप योजना तसेच कौशल्य विकासाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजावीत या हेतूने नुकताच समुपदेशन कार्यक्रम संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये स्वयं रोजगार, उद्योग ,व्यवसाय व सेवा पुरवठा यांची रुची निर्माण व्हावी ,त्यांच्यातील कौशल्यांचा विकास व्हावा  या हेतूने समान संधी केंद्राच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.  

विविध शिष्यवृत्तीच्या योजना, त्यासाठीचे आवश्यक कागदपत्रे, कालावधी,पोर्टल द्वारे भरावयाची माहीती इ.संदर्भात माहीत देण्यात आली.  याबाबत विद्यार्थ्यांनी समयसूचकता पाळून सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे असे मत डॉ. डी सी कांबळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा विजय पाटील  यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते . शेवटी आभार या विभागाचे सदस्य प्रा. ए.एस.कटकोळे यांनी मांडले .  शिक्षकेतर कर्मचारी श्री एस पी वरुटे यांचे  यासाठी सहकार्य लाभले. मा.प्राचार्य. डॉ अनिल पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सदरचा उपक्रम संपन्न झाला .

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.