घोडावत विद्यापीठा कडून धरणग्रस्त भागात शालेय साहित्यांचे वाटप

कोल्हापूर :प्रतिनिधी

दि ३० :संजय घोडावत विद्यापीठचा सामाजिक उपक्रम ‘सौजन्याची वारी आली आपल्या दारी’ अंतर्गत धरणग्रस्त वसाहत कागल येथील श्री. स्वामी समर्थ विद्यामंदिर येथे शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी कागल तालुका कला, क्रीडा, शिक्षण व सांस्कृतिक मंडळाचे संचालक अमेय जोशी हे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना उपक्रमाचे समन्वय प्रा.कोंगे यांनी या उपक्रमाच्या हेतू, उद्देशाबद्दल माहिती दिली. आतापर्यंत गरजू लोकांना मदत, शालेय साहित्यांचे वाटप, ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी, कोरोना काळातील मदत याविषयी सांगितले.आतापर्यंत 17 हजार हून अधिक गरजूंना या उपक्रमांतर्गत मदतीचा हात दिला आहे.धरणग्रस्तांच्या पाल्यांना मदत पोहचविण्याची संधी या शाळेने प्राप्त करून दिल्याबद्दल कोंगे यांनी शाळेचे, ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी जोशी यांनी घोडावत विद्यापीठाच्या उपक्रमाचे स्वागत करून शाळेच्या निवडीबद्दल विद्यापीठाचे आभार मानले.या कार्यक्रमास दूधगंगा विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. डी. बुगडे, सहाय्यक शिक्षक आर. डी. माने, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. विद्यापीठाचे आशिष कुलकर्णी, डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंगचे विद्यार्थी यांनी यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार माने केले तर शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील यांनी आभार मानले.
विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. अरुण पाटील, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांनी हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.