*लोकप्रतिनिधी एकत्र आले तर गावाचा विकास वेगाने होतो*

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर*

चिपरी :प्रतिनिधी

दि:०५:जुन:राजकारणाच्या वेळी राजकारण ठीक आहे पण गावाच्या विकासाचे काम जेंव्हा येते त्यावेळी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवत गावातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम केले तर त्या गावाचा विकास झपाट्याने आणि वेगाने होतो, त्यामुळे विकास कामांसाठी मतभेद बाजूला ठेवत गावगाडा चालवणाऱ्या कारभाऱ्यांनी एकत्र यायला हवे असे उदगार माजी मंत्री शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काढले

 

चिपरी अडीच वर्षाच्या कार्यकाळात जवळपास ७ कोटी ९५ लाखाचा निधी देण्यात आला आहे यापुढे देखील आपल्या गावासाठी निधीचा ओघ कायम राहील असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यावेळी सांगितले,ही योजना पूर्ण झाल्यानंतर गावच्या पूर्वेला असलेल्या पोवार मळा, कोरे मळा व चिपरी बेघर मधील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला,आमदार यड्रावकर यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या जल जीवन मिशन योजनेतील ४ कोटी ९९ लाख रुपये खर्चाच्या नळ पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते, ग्रामविकास आघाडीचे नेते अभयकुमार पाटील, सरपंच निर्मला कोळी, यड्राव को-ऑपरेटिव बँकेचे संचालक शिवाजीराव बेडगे, माजी सरपंच बबन यादव प्रमुख उपस्थित होते, सुरुवातीला चिपरी बस स्थानकापासून कार्यक्रम स्थळापर्यंत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे फटाके फोडत हलगी ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले, या योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या नियोजित पाण्याच्या टाकीच्या मुख्य जागेचा पायाभरणी शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला,यावेळी अभयकुमार पाटील यांच्या हस्ते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा, शितल पाटील यांनी शिवाजीराव बेडगे यांचा, शिवाजीराव जगदाळे यांनी बबन यादव, यांचा सरपंच निर्मला कोळी यांनी या कामाचे ठेकेदार संजय पाटील व उप अभियंता लिमये साहेब यांचा तर तंटामुक्त अध्यक्ष रणजीत कांबळे यांनी ग्रामविकास अधिकारी कारखेले साहेब यांचा सत्कार केला, आभार राजू कोळी यांनी मानले.

माजी सरपंच सौ अमृता गावडे, ग्रा.प.सदस्या सौ.आंनदी जगदाळे दीपिका परीट,अर्चना पाटील,बबिता पांडव, बापू पंडित सेवा सोसायटीचे संचालक सुधीर लोहार, माजी संचालक बाबासाहेब काडे,दादा पाटील, नामदेव कांबळे, राजाराम माने,रावसाहेब पाटील (भाऊजी) श्रीकांत पोवार,सुदर्शन उपाध्ये, आपाश पाटील, विद्याधर सुभाष मगदूम, अनिल मगदूम, बंडू उपाध्ये,बापू उपाध्ये,तंटामुक्त उपाध्यक्ष अरुण कांबळे, पुरस्कार प्राप्त माजी तंटामुक्त अध्यक्ष आनंदा पांडव माजी ग्रामपंचायत सदस्य भरत कांबळे, सुनील कांबळे, करीम मुजावर,अभय नेमगोंडा पाटील, दिलीप पांडव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.