इचलकरंजी कबनुर येथे बकरी ईद मोठ्या उत्साहाने साजरी
इचलकरंजी:प्रतिनिधि: चंदुलाल फकीर
दि:२९:जुन:इचलकरंजी शहर व कबनुर परीसरात मुस्लीम बांधवांच्या वतीने बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली.कबनूरमधील मज्जिदचे ईदगा, इचलकरंजी स्टेशन रोडवरील ईदगा मैदान येथे सामूहिक प्रार्थनेवेळी विश्वशांती सह सामाजिक सलोखा, चांगले पाऊसमान व येणाऱ्या सर्व संकटापासून सर्वजण सुखरूप राहावेत, सर्व समाजाच्या समाज बांधवांमध्ये एकता व बंधुता कायम राहावी यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
. इचलकरंजी येथील हजरत सय्यद मगतूम वली दर्गा आणि ईदगाह ट्रस्ट यांच्यावतीने स्टेशन रोडवरील ईदगा मैदानावर सामूहिक नमाज पठनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रूहानी मस्जिदचे मुक्ती फिरोज चांदकोटी यांनी बयान केले तर कबनूर मदरसा येथील कारी मुजम्मिल यांनी नमाज,दुवा पठन केले. यावेळी देशभरात पाऊसमान चांगले व्हावे आणि महापुरासह सर्व संकटापासून सर्वांचे रक्षण व्हावे, सर्व विश्वामध्ये एकता बंधुत्व कायम राहावे यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.कबनूर परिसरातील मुस्लिम समाजाच्या वतीने बकरी ईद निमित्त सकाळी तक्वा मस्जिद ईदगा येथे हाफिज जाफर फकीर यांनी नमाज,दुवा पठण केले, इनाम मस्जिद,मदिना मस्जिद येथेही सामूहिक नमाज पठण करून दुवा मागितली यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ईदगा मैदान परिसरात गर्दी झाली होती. नमाज पठण नंतर एकमेकांना शुभेच्छा दिल्या.जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित ,अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपाधीक्षक समीरसिंह साळवे, प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगुले, तहसीलदार मनोज ऐतवडे,पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, राजू तहसीलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, शहर वाहतूक शाखेचे विकास अडसूळ, महापालिकेचे अधिकारी यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
हजरत सय्यद मक्तुंम वली दर्गा आणि ईदगा ट्रस्टचे बादशहा बागवान, अहमद मुजावर यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या दरम्यान शहरात अन्य ठिकाणीही शांततेत नमाज पठण झाले. बकरी ईद व आषाढी एकादशी एकाच दिवशी आल्याने मुस्लिम बांधवांनी ईद दिवशी फक्त नमाज पठन,दुवा करणे व कुर्बानी न करण्याचा निर्णय घेतलेला होता.दिवसभर मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी भेटीगाठी घेताना दिसत होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.