वस्त्रोद्योगामधील आधुनिक तंत्रज्ञानाचा वस्त्रोद्योजकांनी स्विकार करावा:
वस्त्रोद्योग सचिव विरेंद्र सिंग यांचे डीकेटीईमध्ये ‘वस्त्रदिशा:२०२३-२८’ या परिषदेत प्रतिपादन
इचलकरंजी:कयुम शेख
दि. १९ जानेवारीः वस्त्रोद्योगाच्या समस्यांचे निराकरण त्वरीत केले जाईल व त्यांच्या नवनविन कल्पनांना वाव देण्यासाठी सरकार तत्पर असेल असे सूतोवाच वस्त्रोद्योग सचिव विरेंद्र सिंग यांनी डीकेटीईमध्ये ‘वस्त्रदिशा:२०२३-२८’ या परिषदेत केले. यावेळी बोलताना ते म्हणाले भविष्यात विजेचा तुटवडा भासणार आहे यासाठी उदयोजकांनी सौर उर्जेकडे वळावे यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य असेल तसेच आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणपूरक शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी योजनांची अंमलबजावणी करण्याकरीता शासनातर्फे उदयोजकांना आवश्यक मदत केली जाईल याची ग्वाही विरेंद्र सिंग यांनी दिली.
डीकेटीई येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग मंत्रालय व डी.के.टी.ई. च्या संयुक्त विद्यमाने ‘वस्त्रदिशा:२०२३-२८’ या परिषदेमध्ये ते बोलत होते.डीकेटीईच्या ऑडिटोरिएम हॉलमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे विरेंद्रसिंग (आयएएस ऑफीसर) सचिव वस्त्रोद्योग विभाग यांच्या हस्ते उदघाटन झाले. या परिसंवादाचे उद्घाटन कार्यक्रमात डे.डायरेक्टर डॉ. यु.जे.पाटील यांनी प्रास्ताविकात वस्त्रोद्योगातील विविध प्रक्रिया व त्यामधील क्रांती यांचे महत्व विषद केले. वस्त्रोद्योग निर्मितीतील सद्य स्थिती लक्षात घेता बहुदिशात्मक क्रांतीद्वारे वस्त्रोद्योग एका नविन उंचीवर पोहचवण्याचा या परिषदेचा उददेश आहे.
आपल्या स्वागतपर मनोगतात, आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजीतील वस्त्रोद्योग विकासाचा संक्षिप्त आढावा घेताना नमूद केले की १९०४ साली नारायणराव घोरपडे यांनी आधुनिकतेचा विचार करुन इचलकरंजीमध्ये वस्त्रोद्योग निर्मितीतील विकासाला चालना दिली आणि सध्या इचलकरंजी मध्ये सर्व प्रकारच्या वस्त्रांच्या निर्मितीबरोबरच टेक्नीकल टेक्स्टाईलने गती पकडली आहे. स्पिनिंग विव्हिंग प्रोसेसिंग गारमेंटींग अशा विविध वस्त्रोद्योगांद्वारे अनेकांना रोजगार उपलब्ध होत असून देशातील सर्वात जास्त दरडोई उत्पन्न असणारे इचलकरंजी हे अग्रगण्य शहर आहे. वस्त्रोद्योगाचा वाढता आवाका लक्षात घेता वीजटंचाई तसेच इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता या समस्यांवर योग्य त्या उपाययोजनांसाठी शासनाने दखल घ्यावी अशी विनंती सचिवांना केली.
विरेंद्र सिंग म्हणाले, वस्त्रदिशा २०२३-२८ ची आखणी करीत असताना गतिमान शाश्वत विकासाचा विचार करण्यात आला आहे. नविन धोरणांचा मूळ उदेदश हा वस्त्रोद्योगातील विविध संघटनांचे एकत्रीकरण करुण शाश्वत विकासाच्या दृष्टीने पुढे जाणे हा आहे. यावेळी उपस्थितांच्या अनेक प्रश्नांचे निराकरण करीत असतांना त्यांनी वस्त्रोद्योगासाठी शासनातर्फे सर्वात जास्त अनुदान दिले जाते व उदयोजकांच्या समस्या विचारात घेूवन त्यावर मार्ग काढला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. डीकेटीईच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे, वस्त्रोद्योग विभागाचे डे. सेक्रेटरी श्रीकृष्ण पवार, श्रध्दा खोचरकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनात संस्थेच्या प्र. संचालिका डॉ एल.एस.आडमुठे यांनी परिषदेसाठी उपस्थित असणारे मान्यवर तज्ञ पदाधिकारी यांचेप्रती आभार व्यक्त केले.
या परिषदेच्या दुस-या सत्रामध्ये वस्त्रोद्योगातील शाश्वत विकास या विषयावर करुण त्यागी, विकेंद्रित वस्त्रोद्योग या संदर्भात निकुंज बगाडिया यांनी मार्गदर्शन केले. टेक्नीकल टेक्सटाईलमधील तज्ञ प्रसन्न जोशी, अमित खटोड, अनिकेत भुते, अनविरप्पा तेलसंग यांचे टेक्निकल टेक्स्टाईल तसेच फायबर टू फॅशन या विषयांवर आर.संपत, सतिश भुतडा, सुनिल घळसासी आणि सुनिल घग यांचे चर्चासत्र संपन्न झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.डॉ.ए.ए.रायबागी यांनी केले. या परिषदेसाठी स्वप्निल आवाडे, वैशाली आवाडे, डीकेटीईचे ट्रस्टी सुनिल पाटील, एस.डी.पाटील यांचेसह इचलकरंजी व परिसरातील सुमारे २५० हून अधिक उद्योजक उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.