मिरज:प्रतिनिधी
दि:२७:Jan: दि. मुस्लिम एज्युकेशन वेल्फेअर ट्रस्ट संचलित चाँद उर्दू हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करियर गायडन्स व परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाले प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक इब्राहिम फैज लक्ष्मेश्वर ( डॉक्टर अल्लामा इकबाल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कुरुंदवाड) लाभले होते
आपले करिअर कसे निवडावे अभ्यासाचे नियोजन कसे करावे हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क कसे करावे याचे मार्गदर्शन अनेक उदाहरणांच्या माध्यमातून सरांनी उत्कृष्टपणे विद्यार्थ्यांना दिले यशस्वी होण्यासाठी आर्थिक परिस्थिती आड येत नाही यासाठी पीपीटी च्या माध्यमातून खडतर प्रवास करून यशस्वी झालेल्या व्यक्तींचे जीवनपट दाखवण्यात आले सोशल मीडियापासून दूर राहून कशा पद्धतीने आपण यश खेचून आणू शकतो याचे मार्गदर्शनही उत्तम प्रकारे केले. खेळी मेळीच्या वातावरणात घेतलेले हे शिबिर विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयुक्त ठरले असे मत शाळेच्या मुख्याध्यापिकेने व्यक्त केले
या मार्गदर्शन कार्यक्रम साठी इयत्ता दहावीचे सर्व विद्यार्थी शिक्षक शाळेच्या प्रशासकीय अधिकारी बागवान मॅडम मुख्याध्यापिका पालेगार मॅडम उपस्थित होत्या स्वागत खालीद मुल्ला सरांनी केले इकरा शेख खदीजा सय्यद या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.