खेरवसे येथील शिवसैनिक भाजपा

ग्रामपंचायत सदस्य, बुथ प्रमुखांसह ग्रामस्थांचा प्रवेश

 

 

लांजा :नसिर मुजावर

तालुक्यातील खेरवसे येथील शिवसेनेचे विद्यमान बुथ प्रमुख व ग्रामपंचायत सदस्यासह गावातील ४० प्रमुख ग्रामस्थांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे भाजपचे जिल्हाध्यक्ष अँड.दिपक पटवर्धन यांच्या हस्ते पक्षाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत करण्यात आले.

नगरसेवक संजय यादव यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला. त्यामध्ये बुथ प्रमुख अनंत सावंत, ग्रामपंचायत सदस्य अनिल पांचाळ,दिपक जाधव, प्रकाश जाधव,शंकर जाधव, यशवंत सावंत,कुणाल सावंत, शांताराम सावंत,रविंद्र पांचाळ, प्रकाश पांचाळ,परशुराम कदम,सुरेश पांचाळ, संतोष लोटणकर,रविंद्र लोटणकर,भरत राणे,अमोल पांचाळ, संतोष लाखन आदिंसह ४० प्रमुख ग्रामस्थांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपच्या लांजा शहर कार्यालयात पारपडलेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष दिपक पटवर्धन यांच्यासह जिल्हाउपाध्यक्ष रविंद्र नागरेकर, लांजा तालुकाध्यक्ष महेश खामकर, जिल्हा सरचिटणीस यशवंत वाकडे, हेमंत शेट्ये, लांजा तालुका भाजप ओबीसी अध्यक्ष मनोहर भिडे, तालुकाउपाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर तसेच गटनेते संजय यादव, नगरसेवक मंगेश लांजेकर, इकबाल गिरकर, विशु जेधे आणि अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.