महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत मॅट नर्सरी प्रात्यक्षिक
महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत मॅट नर्सरी प्रात्यक्षिक
आरवली:(सचिन पाटोळे)
मा. तालुका कृषी अधिकारी संगमेश्वर, मा. मंडळ कृषी अधिकारी आरवली, यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे सरंद ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथे आज शुक्रवार दिनांक १४/६/२०२४ रोजी श्री शंतनू बापट* यांच्या शेतावर मॅट नर्सरी प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्या वेळी मा. तालुका कृषी अधिकारी साहेब उपस्थित राहुन उपस्थित शेतकऱ्यांना MREGS फळबाग लागवड, मागेलं त्याला

शेततळे, MIDH, SMART, PMFAME, MAHA DBT – कृषी यांत्रिकीकरण, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, PM KISAN, या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच खते व बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी या विषय सविस्तर मार्गदर्शन केले. व उपस्थित शेतकऱ्यांचे शंका व अडचनीचे निरसन/ मार्गदर्शन केले. तसेच कृषी सहाय्यक श्री बी. पी. दोंड यांनी यंत्राद्वारे भात लागवडीसाठी मॅट नर्सरी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. एक रुपयात भात व नाचणी पिक विमा योजना, भात पीक स्पर्धा, pm kisan e kyc-npci mapping, गादी वाफ्यावर बियाणे पेरणी करणे, भात पीक स्पर्धा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी श्री सुभाष नलावडे माजी सभापती, श्री संतोष बाळाराम गोटेकर प्रगतशील शेतकरी, पो.पाटील. श्री नंदन भागवत व आदी शेतकरी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.