मणेरे शिक्षण संकुलनात आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडीचे आयोजन
कबनूर : हबीब शेखदर्जी
दि .१७ :श्री. डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज व कुसम ऑलिम्पियाड, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१७-०७-२०२४ रोजी आषाढी एकादशीनिमित्त विद्यालयात वारकरी दिंडीचे आयोजन करणेत आले. संस्थेचे संस्थापक मा.श्री. सुधाकररावजी मणेरे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करणेत आले. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.सुभाष केटकाळे, संस्थेचे समन्वयक मा.श्री.अशोक वसगडे हेही उपस्थित होते
. लेझ्रीम व टाळांच्या गजरात आणि पारंपारिक वेशभूषेत दिंडी मोठ्या उत्साहात साजरी करणेत आली.दिंडीच्या वेळी विद्यार्थ्यांनी पावसाला साकडे घालणारे विविध पोस्टर्स सादर केले. विठठल-रखुमाईच्या नावाच्या गजरात दिंडी पार पाडण्यात आली. सदर दिंडीसाठी सौ. कुसुमताई प्राथमिक विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. पुष्पा ऐनापुरे, मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ.वैशाली मंगसुळे, तसेच सर्व शिक्षक- शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.