आण्णासाहेब बाळासाहेब चकोते” इंग्लिश स्कूलचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
शिरोळ :कयुम शेख
दि २५ फेब्रुवारी: “आण्णासाहेब बाळासाहेब चकोते” इंग्लिश स्कूलच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला नवा आयाम दिला. हा कार्यक्रम म्हणजे सहकुटुंब आणि सहपरिवार पाहण्याचा एक उत्तम कलाविष्कार ठरला. विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य आणि विविध कला सादर करत समाजप्रबोधनात्मक संदेश प्रभावीपणे मांडले.
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन
नर्सरी ते इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मनोरंजन, तंत्रज्ञान, संस्कृती, विज्ञान आणि आध्यात्म याची सुंदर सांगड घातली. विशेष आकर्षण ठरले ते महाराष्ट्रातील आराध्य दैवतांचे प्रभावी सादरीकरण. याशिवाय चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केलेले सूत्रसंचालन उपस्थितांचे विशेष कौतुक मिळवून गेले.
कार्यक्रमाचे उद्घाटन आणि मार्गदर्शन
सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन “चकोते ग्रुप”चे चेअरमन मा. आण्णासाहेब चकोते यांच्या हस्ते झाले. त्यांनी विद्यार्थी आणि पालकांना मौलिक मार्गदर्शन करत समाज आणि शिक्षणाच्या प्रगतीसाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व स्पष्ट केले.
प्रो कबड्डी खेळाडू आर्यवर्धन नवले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण
दिनांक १२ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध प्रो कबड्डी खेळाडू आर्यवर्धन नवले (संघ – पुणेरी पलटण) यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य
हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्हा. चेअरमन मा. सतीश चकोते, सेक्रेटरी बाळासाहेब चकोते, संचालिका प्रज्ञा चकोते, प्रिन्सिपल विजय निकम, को-ऑर्डिनेटर वैशाली पाटील तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि चकोते ग्रुपचा संपूर्ण स्टाफ यांनी विशेष मेहनत घेतली. पालकांनीही यासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.