इचलकरंजीत रक्षाबंधन सोहळा उत्साहात

मतदारसंघातील माता-भगिनींच्या सन्मानासाठी कटिबद्ध – आमदार राहुल आवाडे

इचलकरंजी : अन्वर मुल्ला 
दि .१२ : मतदारसंघातील माता-भगिनींना योग्य तो सन्मान मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध असून, महिलांच्या स्वावलंबनासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी दिली. वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असलेल्या इचलकरंजीत जितकी मेहनत पुरुष करतात तितकीच मेहनत येथील माता-भगिनी देखील करतात. यंत्रमागाबरोबरच गारमेंट व्यवसायातही महिलांनी पुढाकार घेऊन स्वावलंबी बनावे, असे आवाहन त्यांनी केले.

भाजप शहर कार्यालयात रविवारी भाऊ-बहिणींचे नाते जपणारा रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील जवळपास ५०० हून अधिक बहिणींनी माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांना राखी बांधून बंधुभाव व्यक्त केला. महिलांची सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी मी सदैव तुमचा भाऊ म्हणून पाठीशी उभा राहीन, असे आश्वासनही आमदार आवाडे यांनी दिले.

या प्रसंगी प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, भाजपा शहर पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे, पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते, नरसिंह पारीक, राजू भाकरे, अश्विनी कुबडगे, रमा फाटक, पुनम जाधव, नजमा शेख, सपना भिसे, अर्चना कुडचे, सीमा कमते, जयश्री शेलार, मंगल सुर्वे, सुवर्णा लाड, नागुबाई लोंढे यांच्यासह महिला, तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.भावना, स्नेह व बंधुभावाचा संदेश देणारा हा रक्षाबंधन सोहळा सर्वांच्या मनात कायमचा घर करून गेला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.