बाणेर पासपोर्ट कार्यालयात 4 मार्च रोजी पीव्हीआर तक्रारीसाठी जनसंवाद सत्र
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.२१: प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे आणि पोलिस आयुक्त कार्यालय, पुणे यांच्या सहकार्याने अर्जदारांच्या पोलिस पडताळणी पीव्हीआर संबधीत तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जनसंवाद सत्र पुण्यातील क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय, बाणेर येथे बुधवार, ४ मार्च २०२६ रोजी दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
अर्जदारांनी दुपारी २ वाजता नोंदणीसाठी हजर रहावे तसेच अर्जदार पूर्व अपॉइंटमेंट शिवाय ओपन हाऊसमध्ये उपस्थित राहू शकतात. तसेच, उपस्थित अर्जदारांनी त्यांच्या तक्रारींचे प्रभावी निराकरण करण्यासाठी त्यांचे Objection Letter (जर असतील तर) आणि सर्व संबंधित कागदपत्रे सादर करावयाची आहेत. या जनसंवाद सत्रावेळी पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय आणि पुणे पोलिस यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.