श्रद्धा इन्स्टिट्यूटच्या कु.प्रणव बागरेचा याने इंडियन नॅशनल फिजिक्स ओलंपियाड परीक्षेत मिळविले ऐतिहासिक यश.

(देशातील सर्वोत्तम 20 विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये स्थान प्राप्त करीत ओरिएंटेशन कम सिलेक्शन कॅम्प 2026 साठी पात्र)

इचलकरंजी –विजय मकोटे

दि.१९ : भारतीय भौतिकशास्त्र शिक्षक संघटना ( IAPT) द्वारे आयोजित केली जाणारी इंडियन नॅशनल फिजिक्स ओलंपियाड ही भारतातील एक प्रतिष्ठित स्पर्धा परीक्षा आहे. जी नॅशनल स्टॅंडर्ड एक्झामिनेशन इन फिजिक्स ( NSEP) या परीक्षेचा दुसरा टप्पा आहे. या अतिशय उच्च काठीण्य पातळी असणाऱ्या परीक्षेत इचलकरंजी येथील श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करियर डेव्हलपमेंटचा विद्यार्थी कु. प्रणव बागरेचा याने ना भूतो ना भविष्यती अशी उज्वल कामगिरी बजावत या परीक्षेच्या तिसऱ्या टप्प्यात अर्थात ओरिएंटेशन कम सिलेक्शन कॅम्प मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. एकूण तीन स्टेजमध्ये ही स्पर्धा घेतली जाते. सदर परीक्षेत कु. प्रणवने मिळवलेले यश श्रद्धा इन्स्टिट्यूट व महाराष्ट्रासाठी अतिशय गौरवाचे व अभिमानास्पद आहे. याचे कारण संपूर्ण भारत देशातून या कॅम्प साठी ३५  विद्यार्थी निवडले जातात. यामध्ये प्रणव बागरेचा या विद्यार्थ्याने पहिल्या २०  मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. या कॅम्पमधून कोलंबिया येथे होणाऱ्या इंटरनॅशनल फिज़िक्स ऑलींपियाड साठी भारत देशासाठीचा संघ निवडला जातो. या परीक्षेमुळे कु. प्रणवला भारत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्ण संधी मिळू शकते. सदर कॅम्पचे आयोजन मे-जून २०२६ दरम्यान मुंबई येथे केले जाईल. प्रणव बरोबरच इन्स्टिट्यूटचे आणखी दोन विद्यार्थी कु.प्राची चौगुले, व कु.प्रणव कोरे हे विद्यार्थी या परीक्षेत राज्य पातळीवर अभूतपूर्व यश मिळवत स्टेट टॉपर ठरले.

इचलकरंजी येथील श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करियर डेव्हलपमेंट ही शैक्षणिक संस्था सध्या ‘उत्कृष्टतेचे नवे पर्व’ या टॅगलाईन सोबत आपली वाटचाल करीत आहे. जेईई ,नीट, सीईटी, अन्य स्पर्धा परीक्षेच्या निकालामध्ये दमदार यश संपन्न करीत पश्चिम महाराष्ट्रात आपला नावलौकिक वाढविला आहे. प्रणव बागरेचा याने मिळवलेल्या अभूतपूर्व यशाने श्रद्धा इन्स्टिट्यूटची मान अभिमानाने अधिकच उंचावलेली आहे.

भविष्यामध्ये श्रद्धा इन्स्टिट्यूट अशा उच्च काठीण्यपातळी असणाऱ्या परीक्षेस सामोरे जात विद्यार्थ्यांचे करिअर घडवीत त्यांचे हित जोपासेल. शैक्षणिक क्षेत्रात नवीन क्रांती घडवत असताना विद्यार्थ्यांच्या मध्ये शिस्त, मूल्य,संस्कार रुजवण्याचे कामही श्रद्धा प्रामाणिक करेल असे असे उद्गार संस्थेचे अध्यक्ष श्री.ए.आर तांबे यांनी प्रणवच्या सत्कार समारंभ प्रसंगी काढले.सदर विद्यार्थ्याला संस्थेचे अध्यक्ष श्री.ए.आर तांबे, समन्वयक श्री.एम एस.पाटील, सौ. संगीता पवार, सौ. सुप्रिया कौंदाडे, श्री.अभिषेक तांबे, सौ.सृष्टी तांबे, श्री. बिप्लब पॉल सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.