कार्तिकी दिंडीचा सांगता समारंभ व महाप्रसादाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
कबनूर : हबीब शेखदर्जी
दि:20 नोव्हेंबर येथील श्री संत नामदेव शिंपी समाज, श्री विठ्ठल-रुक्मिणी व नामदेव महाराज मंदीर यांचे वतीने कबनूर ते पंढरपूर नवव्या पायी कार्तिकी दिंडीचा सांगता समारंभ व महाप्रसादाचा ( म्हमद ) कार्यक्रम उत्साहात पार पडला.
नामदेव शिंपी समाज अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाडीक यांनी सकाळी श्री विठ्ठल- रुक्मिणी व नामदेव महाराज यांना अभिषेक घातला. त्यानंतर श्री विठ्ठल भजनी मंडळाचे भजन व माजी ता. पं. सदस्य जयकुमार काडाप्पा, माजी सरपंच सुनिल स्वामी व जयकुमार केटकाळे यांचे हस्ते आरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी दिंडीतील आचारी राजू गाडेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन आप्पासो पाटील, आप्पा गायकवाड , महावीर फरांडे, नामदेव मौ, गोकुळ वायभट, धोंडीराम चव्हाण, वारकरी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.