प्रधानमंत्री आवास याेजनेतील घरकुल आता 372 चाै.फुटाचे : प्रकाश आवाडे

किंमत तीच फक्त क्षेत्र वाढले

इचलकरंजी: विजय मकोटे
दि.प्रधानमंत्री आवास याेजना अंतर्गत साकारण्यात येत असलेली घरकुले आता३२५  चाै.फुटाऐवजी ३७२  चाै.फुटाची असणार आहेत. घरकुलाचा कार्पेट एरीया वाढला असला तरी घराची किंमत पूर्वी जाहीर केल्याप्रमाणेच १०  लाखच असणार आहे, अशी माहिती या घरकुलाचे मुख्य प्रवर्तक प्रकाश आवाडे यांनी दिली.


इचलकरंजी शहर व परिसरातील गरीब, कष्टकरी कामगार वर्गासह छाेटे व्यापारी, रिक्षा व टेम्पाेचालक, नाेकरदार  सर्वसामान्यांना हक्काचे घरकूल मिळवून देण्यासाठी ’प्रकाश आवाडे गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या’ वतीने शहर व परिसरात ५  हजार घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान आवास याेजनेसह अन्य याेजनांच्या अनुदानाचा लाभही संबंधित लाभार्थ्यांना  देण्यात येणार आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून जय सांगली नाका परिसरातील शरद इन्स्टिट्युटच्या मागे इचलकरंजी-टाकवडे राेडवर घरकुले उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक घरकूल हे पूर्वी ३२५  चाैरस फुटाचे निश्चित करण्यात आले हाेते. या घरकुलात एक लिव्हींग रूम, किचन, बेडरूमसह स्वतंत्र संडास, बाथरूमही असणार आहे. त्याचबराेबर युटीलीटी सुविधाही उपलब्ध असणार आहे. शिवाय घरकुल लाभार्थ्यांसाठी प्ले ग्राउंड, नाना-नानी पार्क, लहान मुलांसाठी खेळणी, अभ्यासिका, माेठा हाॅल आदी सुविधाही निर्माण करण्यात येणार आहेत.
पूर्वी प्रत्येक घरकुलासाठी३२५  चाै.फुट इतके क्षेत्र निश्चित करण्यात आले हाेते. आता त्यामध्ये वाढ करण्यात आली असून हे क्षेत्र ३७२ चाै.फुट इतके असणार आहे. एकूण बिल्टअप क्षेत्र हे ४१३.७७  चाै.फुट क्षेत्र वाढल्यामुळे आतील सुविधासुध्दा प्रशस्त हाेणार आहेत. प्रत्येक घरकुल हे १० लाखाचे असणार असून क्षेत्र वाढले असले तरी घरकुलाच्या किंमतीत काेणताही बदल हाेणार नाही, असेही आवाडे यांनी सांगितले. घरकुलासाठीची प्रक्रिया सुरु असून अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी आमदार राहुल आवाडे जनसंपर्क कार्यालय, श्री शिवतीर्थ बसस्थानक शेजारी, स्टेट बँकेच्या मागे याठिकाणी संपर्क साधावा.
याप्रसंगी क.आ.इचलकरंजी जनता बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे, प्रकाश दत्तवाडे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, रुबन आवळे, शेखर शहा, रमेश कबाडे, चंद्रकांत पाटील, महेश सातपुते, राजेंद्र आरेकर, सुहास अकिवाटे, नरसिंह पारीक, डाॅ. सुषमा पुजारी, सपना भिसे, नजमा शेख, सीमा कमते, अर्चना कुडचे, मंगल सुर्वे, विद्या लवटे, राजू बाेंद्रे, संताेष शेळके, नागेश पाटील आदींसह मान्यवर उपस्थित हाेते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.