मणेरे शिक्षण संकुलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
इचलकरंजी,: विजय मकोटे
दि. १५ ऑगस्ट : श्री. देवाप्पा आप्पा मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, सौ. कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात ध्वजपूजन व ध्वजारोहणाने झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच व विद्यमान सदस्य मा. श्री. मधुकर मणेरे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. शीतलकुमार मणेरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. सुभाष केटकाळे, सेक्रेटरी मा. श्री. अनिलकुमार मणेरे, सदस्य मा. श्री. प्रेम मणेरे, मा. श्री. सम्मान मणेरे, मा. श्री. मनोहर मणेरे, मा. श्री. अरुण मणेरे, मा. सौ. ज्योती मणेरे, मा. सौ. साक्षी मणेरे तसेच संस्थेचे समन्वयक मा. श्री. अशोक वसगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे मा. श्री. मधुकर मणेरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “स्वातंत्र्याचा खरा अर्थ देशाप्रती आपली जबाबदारी ओळखून युवकांनी आपली कर्तव्ये पार पाडण्यात आहे. देशाच्या प्रगतीमध्ये युवकांनी सदैव पुढे असले पाहिजे. सर्वगुणसंपन्न विद्यार्थी हेच देशाच्या भविष्यातील आधारस्तंभ आहेत.”
यावेळी विद्यार्थ्यांनीही देशभक्तीपर भाषणे करून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद केले. २०२६ मधील परीक्षेत यश संपादन करणाऱ्या दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच N.M.M.S. परीक्षेतील गुणवंत व पात्र विद्यार्थ्यांचा आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीम, झांज पथक तसेच देशभक्तीपर गीतांवरील संगीतमय कवायतीने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुधा शिलेदार यांनी केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय सौ. केतकी काळे यांनी करून दिला, तर आभार सौ. दिपा चौगुले यांनी मानले.यावेळी मणेरे हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ. वैशाली मंगसुळे, सौ. कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. पुष्पा ऐनापूरे, कॉलेज विभागप्रमुख सौ. दिपाली चौगुले, बालवाडी विभागप्रमुख सौ. स्वाती ढेकळे, कुसुम ऑलिम्पियाड विभागप्रमुख श्री. शैलेश कांबळे यांच्यासह शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.