सराईत गुन्हेगार अनिल येजरे याला दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी 

दि .२० : शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार अनिल निवृत्ती येजरे (रा. वैरण बाजारजवळ, इचलकरंजी) याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण सहा गुन्हे दाखल असल्याने त्याला दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई दि. १६ ऑगस्ट २०२६ पासून लागू झाली असून, दि. १५ ऑगस्ट २०२८ पर्यंत त्याची हद्दपारी राहणार आहे.अनिल येजरे याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तीन, हुपरी पोलीस ठाण्यात एक, पन्हाळा पोलीस ठाण्यात एक आणि इचलकरंजी पोलीस ठाण्यात एक असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. तो सराईत गुन्हेगार असल्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वतीने तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडून प्रस्ताव क्र. ०३/२०२५, जावक क्र. ४२७४/२०२५, दि. १३ जून २०२५ अन्वये इचलकरंजी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत उपविभागीय दंडाधिकारी, इचलकरंजी यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. सदर प्रस्तावाला उपविभागीय दंडाधिकारी, इचलकरंजी यांनी हद्दपार एसआर/३३/२०२५, दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी मंजुरी दिली.त्यानुसार अनिल येजरे याला दि. १६ ऑगस्ट २०२६ पासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने, सहाय्यक फौजदार अनिल चव्हाण तसेच पोलीस अंमलदार सद्दाम सनदी, गणेश सनदी, शिरीष कांबळे, प्रमोद चव्हाण, विकास चौगुले, राहुल कामत व तुपार सूर्यवंशी यांनी केली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.