महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले श्री महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन  

कोल्हापूर: प्रविण भोसले

दि.२३: महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले.

  दर्शनानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की,राज्यातील सर्व नागरिकांना सुख,समृद्धी प्राप्त होवो व चांगला पाऊस पडून पर्यावरणाचे संवर्धन होवो तसेच राज्यातील शेतकरी समृद्ध होवो यासाठी श्री महालक्ष्मी अंबाबाईचरणी प्रार्थना केल्याचे सांगितले. यावेळी महसूलमंत्र्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधला तसेच मंदिर परिसराची पाहणी केली.देवस्थान समितीच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांच्या हस्ते महसूलमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला .

  याप्रसंगी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर,आमदार अमल महाडिक,आमदार शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड,पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सचिव वर्षा साळुंखे-परीट, महादेव दिंडे,महेश जाधव,विजय जाधव,नाथाजी पाटील आदी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.