डीकेटीईत नव्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत: उज्ज्वल ज्ञान, कौशल्य व नवोपक्रमांचा रवी आवाडे यांनी विद्यार्थ्यांना स्वागत समारंभात दिला प्रेरणादायी कानमंत्र
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .३-आभियांत्रिकी शिक्षणासोबतच कौशल्य, संशोधन, नवोउपक्रम आणि उदयोगाभिमुख ज्ञान आत्मसात करुन विद्यार्थ्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगासाठी स्वतःला सक्षम करावे, असे आवाहन डीकेटीईचे कार्यकारी संचालक रवी आवाडे यांनी केले. डीकेटीईमध्ये प्रथम वर्ष बी.टेक. टेक्स्टाईल व इंजिनिअरींग, डिप्लोमा, एमबीए व एमसीए अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभ व विद्यार्थी परिचय कार्यक्रम उत्साहात पार पडला. नव्या विद्यार्थ्यांना संस्थेची शैक्षणिक संस्कृती, विविध उपक्रम, आधुनिक सुविधा आणि उपलब्ध संधीची ओळख करुन देणे हा कार्यक्रमाचा उददेश होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे होत्या.
यावेळी रवी आवाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, केवळ पदवी मिळविण्यावर न थांबता आपल्या आवडीच्या क्षेत्रात सातत्याने नवे ज्ञान आत्मसात करण्यावर भर दयावा,असे सांगितले विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तम करिअरसाठी अनेक प्रेरणादायी मंत्र सांगितले हे सांगत असताना इंजिनिअरींग शिक्षणाबरोबरच वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्सेस, तसेच संस्थेतील आयडीया लॅब, फायजी लॅब विवध तांत्रिक सुविधा, संशोधनाच्या संधी, प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि उदयोगांशी असलेल्या सहकार्याचा विद्यार्थ्यांनी पुरेपुर लाभ घ्यावा असे नमूद केले. विद्यार्थीदशेत चांगला रिसर्चसाठी वापर करावा तसेच विद्यार्थ्यांनी देशहीत तसेच सामाजिक कार्यात सहभाग घ्यावा. डीकेटीईमध्ये उपलब्ध आधुनिक तंत्रज्ञानानचे भांडार आत्मसात करुन विद्यार्थ्यांनी ज्ञानाने समाज, देश आणि डीकेटीईचा असाच नावलौकीक वाढवावा असे सांगून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस.आडमुठे यांनी संस्थेतील शैक्षणिक गुणवत्ता, उद्योगाभिमुख शिक्षण, प्लेसमेंट, संशोधन, आंतरराष्ट्रीय संधी आणि विविध विद्यापीठे व उद्योगांशी असलेल्या सहकार्याची माहिती देवून पेन्सिल चे उत्तम उदाहरण दिले. प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ ए.के.घाटगे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, शैक्षणिक नियोजन आणि प्राध्यपकांशी समन्वय याबाबत मार्गदर्शन केले. डे.डायरेक्टर प्रा.डॉ.यु.जे. पाटील यांनी विद्यार्थ्यांना संस्थेच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखन्नीय कामगिरीची माहिती दिली. डीन डॉ एस.के.शिरगांवे यांनी गतवर्षी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांची नावे उल्लेखली. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणा-या, प्लेसमेंट झालेल्या व परदेशात एम.एस.अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा मानद सचिव डॉ सपना आवाडे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगीताने झाली. सौ एस.ए. पाटील यांनी ‘सॉग ऑफ युथ‘ हे सर्वाना सांगितले. प्रा.आर.के.वळसंग यांनी आभार मानले. सुत्रसंचालन प्रा. शिवतेज पाटील यांनी केले.कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख, टेक्स्टाईल व इंजिनिअरींग टीपीओ, आदींची उपस्थिती होती.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.