माहेश्वरी समाजाच्या संघटनात्मक वाटचालीला नवी दिशा
महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार; पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीचा इचलकरंजीत समारोप
इचलकरंजी:अन्वर मुल्ला
दि ९ : महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या मार्गदर्शनाखाली व कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने आयोजित पश्चिम महाराष्ट्र विभागाची पहिली विभागीय बैठक रविवारी (दि. ६ सप्टेंबर) महेश भवन, इचलकरंजी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासोबतच संघटनेच्या आगामी वाटचालीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संघटनेचे माजी अध्यक्ष चंदनमलजी मंत्री यांनी भूषविले. यावेळी कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत यांनी स्वागत व मनोगत व्यक्त करून जिल्हा सभेच्या आगामी योजनांची माहिती दिली.
या बैठकीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ‘त्रिवेणी संगम’. पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्हा सभा, जिल्हा महिला संघटना, तहसील सभा तसेच जिल्हा युवक संघटनांचे अध्यक्ष व सचिव यांना एकाच व्यासपीठावर आणून प्रदेश सभेच्या पदाधिकाऱ्यांनी समाजातील समस्या, सूचना, अपेक्षा व विविध विषयांवर थेट संवाद साधला.या उपक्रमामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला आपले विचार मांडण्याची संधी मिळाली असून, संघटनेशी अधिक घट्ट जोडले गेल्याची भावना निर्माण झाली. कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा, उत्साह आणि संघटनेप्रती जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याचे उपस्थितांनी सांगितले.
नवीन प्रदेश पदाधिकाऱ्यांचा सत्कार
यावेळी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या सन २०२६-२०२९ या कालावधीतील नवीन पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यामध्ये प्रदेशाध्यक्ष ब्रिजगोपालजी तोष्णीवाल, सचिव विनीत तोष्णीवाल, कोषाध्यक्ष संजय दाहाड, संघटन मंत्री उमेश मुंदडा, मराठवाडा उपाध्यक्ष श्यामसुंदर सोमाणी, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रीकांत लखोटिया, पश्चिम महाराष्ट्र संयुक्त मंत्री सागर सारडा, उत्तर महाराष्ट्र संयुक्त मंत्री महेश बंग, कोकण विभाग संयुक्त मंत्री गोविंद अट्टल, अध्यक्षीय कार्यालयीन मंत्री दत्तप्रसाद तोतला तसेच सचिव कार्यालयीन मंत्री सुशील इनानी यांचा सत्कार करण्यात आला.
कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष नितीन धूत, कार्यक्रमाध्यक्ष चंदनमल मंत्री, महेश सेवा समितीचे अध्यक्ष द्वारकाधीश सारडा व वेणुगोपाल मुंदडा यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास इचलकरंजी तहसील माहेश्वरी सभेचे अध्यक्ष दयानंद बाहेती, कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेचे सचिव मुरली हेडा, शिरोळ तहसील माहेश्वरी सभेचे अध्यक्ष शैलेंद्र लोया, करवीर तहसील माहेश्वरी सभेचे दिलीप बजाज, इचलकरंजी तहसील माहेश्वरी महिला संघटनेच्या अध्यक्षा सौ. शोभा काबरा, इचलकरंजी माहेश्वरी महिला मंडळाच्या सचिव सौ. पद्मा खाबानी, महेश नवयुवक मंडळाचे अध्यक्ष अखिल बाहेती यांच्यासह समाजातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन कौतुकास्पद
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश खाबानी व सह-सचिव शिवप्रसादजी तपाडिया यांनी केले. कार्यक्रमाचे सुरेख नियोजन सुरेश दरगड, अशोक मंत्री, बजरंग काबरा, सुरेंद्र हेडा, वासुदेव बांगड, चंद्रप्रकाश नवाल, बालकिशन टुवाणी, मनोज राठी, हरीश सारडा, अशोक भूतडा, लक्ष्मीकांत बांगड, उमेश राठी, दिनेश बांगड व लक्ष्मीकांत मालपाणी यांनी केले.पश्चिम महाराष्ट्रातील विविध घटकांना एकत्र आणत थेट संवादाच्या माध्यमातून समाजाच्या अपेक्षा जाणून घेणारी ही बैठक माहेश्वरी समाजाच्या संघटनात्मक वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.